कोळवाडे येथे महिला शक्ती ग्रामसंघ भावनाचे उद्घाटन
संगमनेर । झुंजार न्यूज
प्रत्येक कुटुंबाच्या आणि देशाच्या विकासातही स्त्रियांचे मोठे महत्त्व आहे. 50 टक्के लोकसंख्या असलेल्या स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून महिला निरोगी असली तर कुटुंब निरोगी राहते. तालुका हा एक परिवार म्हणून आमदार थोरात यांनी प्रत्येक गाव व वाडी वस्तीपर्यंत विकासाच्या योजना राबवल्या असून त्यांनी केलेल्या निळवंडे धरण व कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
कोळवाडे येथे भव्य महिला ग्रामसंग भवन उद्घाटन व तिळगुळ प्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संशोधक कॅन्सर तज्ञ डॉ हसमुख जैन, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पंचायत समिती सदस्य काशिनाथ गोंदे, भाऊसाहेब नवले, सोपान वर्पे ,सौ पुष्पाताई गुंजाळ, बाबुराव गोंदे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, निलेश कोकाटे ,रवींद्र खलाटे ,अभिजीत गंभीरे ,महेश पारधी ,सौ वनिता काटे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी निमित्ताने कोळवाडे येथील वीस बचत गटांच्या माध्यमातून उभारलेल्या स्त्रि शक्ती महिला ग्राम संघ भवनाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले .या कार्यक्रमासाठी सुमारे 700 महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डॉ .जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा राज्यातील प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातो .या तालुक्याच्या विकासातही महिलांचे मोठे योगदान आहे . तालुक्यातील सर्व महिला या खूप कष्टाळू आहेत .सकाळी लवकर उठण्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत शेतीची अनेक कामे त्या सांभाळतात. मात्र हे सर्व करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्त्रियांचे आरोग्य चांगले असेल तर कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. कॅन्सर बाबत वाढता प्रादुर्भाव हा अत्यंत चिंताजनक असून महिलांनी कोणतीही गाठ आली तर त्वरित आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा डॉक्टरांना सांगितले पाहिजे.
यावेळी गटविकास अधिकारी अनिल नागरी यांनी विविध योजनांची माहिती दिली तर काशिनाथ गोंदे भाऊसाहेब नवले, वनिता काटे यांनीही मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले सूत्रसंचालन दिलीप कांबळे व सौ अश्विनी गुंजाळ यांनी केले तर सौ मंगल ताई कुदळ यांनी आभार मानले यावेळी कोळवाडे व परिसरातील महिला नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
