आश्वी | झुंजार न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनदलित , शेतकरी , कष्टकरी , तरुण , महीलासह सर्व सामान्यांना बरोबर घेवून विकासात्मक ध्येय धोरण राबवत अजून विरोधकांनी किती कांगवा केला तरी अब की बार मोदी सरकार , अब की बार 400 पार नुसार मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असा विश्वास व्यक्त करत केद्रींय मंत्री रामदास आठवले यांनी ” पुन्हा एकदा शिर्डीतून लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलून दाखविले “
शिर्डीसह श्रीरामपूर , कोपरगांव दौर्‍यावर केद्रींय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आले असता शिर्डी येथील पत्रकार परिषदेत ना आठवले बोलत होते . याप्रसंगी रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , बाळासाहेब गायकवाड , दिपकराव गायकवाड , अशोकराव गायकवाड , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , कैलास शेजवळ , अशिष शेळके , कैलास कासार , सुनिल शिरसाठ आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी ना . रामदास आठवले पुढे म्हणाले की , केंद्रासह राज्यात सुद्धा शिंदे – फडणवीस – पवार सरकार विविध योजना राबवून चांगले काम करत असल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ४२ पेक्षा जास्त जागा जिंकणार असून भाजपा वरिष्ठांकडे रिपाईला शिर्डीसह दोन जागेची मागणी केली आहे . तर शिर्डीत मी २००९ करिता निवडणुक लढविली होती मात्र माझा पराभव झाला . मात्र मी पुन्हा येणाऱ्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत आता शिर्डीच्या जागेकरिता इच्छुक आहे मात्र भाजपा वरिष्ठासह राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णय काय होईल त्यावर ठरेल असे मत व्यक्त करत आजुन माझी राज्यसभा २०२६ पर्यंत आहे तर लोखंडे हे ही माझे चांगले मित्र आहे संध्या मी संपूर्ण देशात पक्ष वाढविण्याच्या कामात व्यस्त असून देशासह राज्यात प्रत्येक तालुक्यात पन्नास हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते रिपाईशी जोडले आहेत .
ना .रामदास आठवले पुढे म्हणाले की, बाळ ठाकरे यांनी माझ्यासमोर शिवशक्ती व भिमशक्तीचा प्रस्ताव ठेवला तेव्हा मी हा विचार घेवून ९ महीने डॉक्टर , विचारवंत , पत्रकार व तळागाळातील कार्यकर्त्याचा विचार घेवूनचं पुढील उचलले त्यांचा फायदा नक्कीचं झाला . डॉ बाबासाहेबांबद्दल कॉग्रेस भूमिका ही संशास्पद होती वेळोवेळी त्यांना हरविण्याचा प्रयत्न हे कॉग्रेसनेचं केला . तर उध्दव ठाकरे यांनी भाजपाशी युती तोडली ही मोठी चुक केली त्यांना कॉग्रेस – राष्ट्रवादी कारनामे कळताच ते पुन्हा येणार असा विश्वास व्यक्त करत आम्ही त्यांचे पुन्हा आल्यास स्वागतचं करु ! असे म्हणत प्रकाश आंबेडकर हे दलित नेते आहेत त्यांनी योग्य निर्णय घ्यावा त्यांची कॉग्रेस – राष्ट्रवादी बरोबर युती होईल असे वाटत नाही कदाचित ते शेवटच्या क्षणी स्वबळाचा नारा देवू शकतात असे आठवले म्हणाले .
पुढे आठवले म्हणाले की , संविधान बदलण्याची ही केवळ अफवा आहे , कॉग्रेसकडून मागासवर्गियांची दिशाभूल करण्याचे काम होत आहे संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांच्या प्रतिमा तरी त्यांनी आपल्या कार्यालयात लावली का ? व्हि पी सिंग सरकारने बाबासाहेबांना भारतरत्न दिला . आता महात्मा फुले , साठेना भारतरत्न मिळावे म्हणून प्रयत्न करणार असून लालकृष्ण आडवाणी यांना त्यांच्या पक्ष कार्यस भारतरत्न मिळाला हे स्वागतचं आहे .
चौकट
संविधान बदलण्याच्या हालचाली झाल्यास पहिला मी माझ्या मंत्री पदाचा राजीनामा देईल . संविधान बदलण्याच्या हे केवळ कॉग्रेसकरवी अफवा आहेत .
रामदास आठवले ( केद्रींय सामाजिक न्याय मंत्री )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *