शिर्डी । झुंजार न्यूज
निवडणुकीचे वारे वाहू लागताचं शिर्डी लोकसभेची इच्छुकांची भावगर्दी दिसून येत असून याकरिता रामदास आठवले यांच्यासह विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरु असताना विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आज शनिवारी रामदास आठवले शिर्डीसह कोपरगांव श्रीरामपूर येथे येणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे राजकिय पक्षाच्या नेत्यासह संपूर्ण लोकसभा मतदार संघाचे लक्ष्य लागल्याचे दिसून येत आहे .

२००९ पासून शिर्डी लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्याने अनेक इच्छुकांची या मतदार संघावर नजर लागुन आहे दलित पँथर चळवळीपासून रामदास आठवले यांचे शिर्डीसह नगर जिल्हयावर विशेष प्रेम व जिव्हाळा राहिला ते मुंबईला राहत असले तरी नगर जिल्हयातील प्रत्येक गांव , प्रत्येक माणुस व कार्यकर्त्याना नावानिशी ते ओळखतात . सामाजिक , राजकिय चळवळीतील ते एक भारत भ्रम करणारे नेते आहेत . तरुणाई पासून ते वयोवृद्धापर्यत ते समाज्याच्या गळ्यातले ताईत बनले मोर्चा , आंदोलनाच्या माध्यमातून अनेक समाज्याचे त्यांनी प्रश्न सोडविले , सोडवत आहे . तर गल्ली ते दिल्ली पर्यत एक धूरधंर व कणखर व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित असल्याने ते जिकडे जातील तिकडे नक्कीचं सत्ता येते हे गणित ठरलेले आहे .

आता केव्हा ही लोकसभेची आचार सहिंता लागू शकती म्हणजे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे त्याच पार्श्वभुमीवर आज शनिवार दि ३ फेबूवार २०२४ रोजी दुपारी रामदास आठवले शिर्डीसह कोपरगांव , श्रीरामपूर मध्ये विविध कार्यक्रमाकरिता येत असल्याने त्यांच्या मनात काय आहे हे त्याच्या बोलण्यातून कळणार असल्याने संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष्य त्यांच्याकडे लागले असून त्याच्या बोलण्यातून कोण तरणार कोण जाणार हे दिसणार आहे

गेल्या १५ वर्षात लोकप्रतिनिधीतून कणखर असा विकास झालेला दिसत नाही या मतदार संघातून दिल्ली दरबार वजन असलेल्या व्यक्तीमत्वाची गरज असल्याने भविष्यात बेरोजगारी कमी होण्याकरिता औदयोगिक वसाहतीची गरज असल्याने मोठे उदयोग धंन्दे आणणार संध्यातरी एक दमदार व्यक्तीमत्व रामदास आठवले यांच्या माध्यमातून दिसत आहे .
