चित्रपट अभिनेत्री माधवी पवार , हिंदवी पाटील , सायली केळकर , राधिका पाटील यांचा जल्लोष कार्यक्रम
श्रीरामपूर । झुंजार न्यूज
माता रमाई जयंती व संविधान सन्मान सोहळा निमित्ताने केद्रींय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शनिवार दि.३ फेब्रु.२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीरामपूर येथील रासकर नगर , म्हाडा कॉलनी जवळी वार्ड क्र ७ येथे १००० संविधान वाटपासह संविधान सन्मान सोहळा व विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांनी दिली आहे .

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की भारतीय संविधानाचे महत्व व अधिकार सर्वसामान्य नागरिकांना समजावे.तसेच माता रमाबाई आंबेडकर यांचे आचार व विचारांचा प्रसार होऊन महिलांना रमाबाईचे त्यागाचे महत्त्व समजावे याकरिता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात १००० संविधान वाटप , संविधान सन्मान सोहळा , १००० पैठणी वाटप , नारी शक्ती गौरव सोहळा , आंबेडकरी चळवळीतील जुन्या , नव्या कार्यकर्ताचा सन्मान सोहळासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे .

यावेळी महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील ,
माजी मंत्री तथा राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर , खा सदाशिव लोखंडे , प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे , खा डॉ सुजय विखे पाटील , राष्ट्रीय पक्ष निरिक्षक बी के बर्वे , आदी मान्यवरांची उपस्थिती रहाणार असून सायंकाळी मनोरंजन म्हणून अभिनेत्री माधवी पवार , हिंदवी पाटील , सायली केळकर , राधिका पाटील यांचा जल्लोष हा कार्यक्रम होणार आहे .

तरी या होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ,आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते विकी कापसे , राकेश कापसे , रिपाई विभागीय जिल्हा प्रमुख भिमा बागुल , रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभूवन आदीसह सन्मान कमिटीकडून करण्यात आले आहे.
