पानोडी । झुंजार न्यूज

अनेक दशकाच्या प्रतिक्षेनंतर अखेर निळवंडे धरणाच्या उजव्या कॅनॉल द्वारे सोडलेल्या पाण्यामुळे या पट्ट्यामधील गावां – गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होवून जलपूजन करत गुलाल उधळून फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा होताना दिसत आहे. तर वयोवृद्धांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहताना दिसले .

मागील काही दिवसापूर्वी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते, त्यावेळीही गावोगावी जलपूजन करण्यात आले. आणि आताही जलपूजन सुरू आहे, या प्रसंगाची आठवण पिढ्यानपिढ्या राहावी असे हे ऐतिहासिक क्षण आहेत. ज्या भागात पाणी येते त्या भागात संपन्नता आणि आनंद निर्माण होताना दिसत आहे . यातूनचं सहाजिकच समृद्धी येते. अनेक पिढ्यांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याची लोक वाट पाहत होते मात्र आता हे पाणी या भागात आल्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, शेतकऱ्यांच्या जीवनात आता नवी पहाट उगवली आहे. निळवंडे धरणाची पूर्ती व कालव्यातून पाणी देणे हे आयुष्याचे ध्येय होते ते आता पूर्णत्वास जात असल्याचे समाधान वयोवृद्ध व्यक्त करत आहे.

पानोडी गावाच्या शिवाला पहाटे – पहाटे खिंडीमधून पाणी वाहताचं पाणी येणार म्हणून रात्रभर जागरण करणारे वयोवृद्ध महिला व तरुणाई पाण्याच्या दिशेने धाव घेत डि जे लावत पाण्याच्या पुढे नाचताना दिसत होती जागो – जागो महिला ह्या श्रीफळ , फुले घेवून पाण्याचे औक्षण करत होते . ६० वर्षापासून निळवंडे व कालव्याचे राजकारण होताना दिसले रडत कथत , आरोप – प्रत्यारोप अखेर कालव्यांचे काम पूर्ण झालेचं प्रथम डाण्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आज – ना – उदया पाणी येणार या आशेवर दोन – तीन महिन्याचा कालावधी लागला अखेर २४ जानेवारीला पाणी सोडण्याचा निर्णय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहिर केला त्यानुसार पाणी ही सोडण्यात आले मात्र काही अडचणी निर्माण झाल्याने पुन्हा एकदा उजव्या कालव्याचे लाभार्थी अस्वस्थ झाले . मात्र धिराने घ्या असे सांगत आधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर अडचणी दूर केल्या अन् पाणी कालव्या दाखले झाले आज पाणी पानोडी पास करत पिंप्री लौकी गावांत दाखल झाले .
पक्षविरहीत लोकांनी एकत्र येत पाण्याचे उत्साहात जोरदार स्वागत केले . जनसेवा विकास मंडळ्याच्या कार्यकर्त्यानी राधाकृष्ण विखे पाटील , डॉ सुजय विखे पाटील यांच्या घोषणा देत पाण्याचे स्वागत केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यानी गावातून डॉ बाबासाहेब आंबेडकर घोषणा देत फटाक्याच्या आतषबाजी करत मिरवणुक काढून आपला आनंदोत्सव साजरा केला 
चौकट
लोकांच्या आनंदोत्सव बघून माजी मंत्री आ बाळासाहेब थोरात यांना ही पाणी बघण्याचा मोह आवरला नाही त्यांनी पानोडीच्या उजव्या कालव्यावर थांबून कार्यकर्त्यासह फोटो काढले तर आ थोरात यांच्या हस्ते आज मंगळवार खळी , पिंप्री , पानोडी , अंभोरे येथे जलपूजन होणार आहे
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *