श्रीरामपूर । झुंजार न्यूज
ज्या लोकांनी संविधानाचा अनेकदा अपमान केला, तेच आज आम्ही संविधान बदलतोय, असे आरोप करताहेत. मात्र, जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत संविधान कोणी बदलणार नाही. जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास, त्याची गय करणार नाही, असा खणखणीत इशारा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

येथील म्हाडा कॉलनीतील मैदानावर संविधान व नारीशक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अविनाश महातेकर, राजाभाऊ सरोदे, बी. के. बर्वे, राजाभाऊ कापसे, भीमा बागूल, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लघे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, रिपाई दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे आदी उपस्थित होते.




कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकी कापसे , राकेश कापसे , भिमा बागुल , सुभाष त्रिभुवन आदीसह युवकांनी परिश्रम घेतले .
