कर्जत । झुंजार न्यूज

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील ‘ रिपब्लिकन ‘ हा संपूर्ण भारत देशातील काना – कोपऱ्यात पोहचवून एक मोठी रिपाई ताकद निर्माण केली असून गावां – गावातून असंख्य कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेले असून प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम आठवले करत असल्यानेचं पक्षाला बळकटी देण्याकरिता पदाधिकाऱ्यांच्या पक्षाच्या घटना व नियमा नुसार आदला – बदली होती त्याचं धरर्तीवर दक्षिण जिल्हात पक्ष बळकटीकरिता रामदास आठवलेच्या आदेशाने नव्या – जुन्या कार्यकर्त्याचा समन्वय ठेवत नविन जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली असून जुन्या जिल्हाध्यक्षांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी सांगितले आहे .
कर्जत येथे रमाई जयंतीनिमित्ताने वाकचौरे आले असता पत्रकार परिषदेतून बोलत होते यावेळी संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे , अजय साळवे , अकुश भैलुमे , युवा अध्यक्ष अमित काळे , नगरसेवक भास्कर भैलुमे , श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजू जगताप ,  जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ कदम , युवक दक्षिण उपाध्यक्ष विशाल काकडे , रामकस न साळवे , सागर कांबळे , लखन भैलुमे , नितीन भैलुमे , आकाश साळवे , अमदिश शेख , सिद्धांत कदम , प्रशांत कदम , सागर भैलुमे , रिपाई प्रसिद्धी प्रमुख दक्षिण देवा खरात , दया भैलुमे , सुरेश इंचके , पारनेर तालुकाध्यक्ष राजू उबाळे , आदी उपस्थित होते .
विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की , आता पर्यत भाजपा व मित्र पक्षाकडून रिपाई कार्यकार्त्याला व समाज्याला कधीचं विश्वासात घेवून सहकार्य केले नाही दलित समाज्याकरिता पुरेसा विकास निधी वापरला गेला नसल्याने दोन्ही लोकसभा मतदार संघात दलित सामाज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे तर राजकिय सत्तेतून कुठल्याही कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली नाही ही मोठी खेदाची बाब असून रामदास आठवले यांनी गेल्या १० – १२ वर्षापासून भाजपा बरोबर विश्वास मित्र म्हणून प्रामाणिकपणाने साथ देत आहे मात्र स्थानिक पुढाऱ्यांकडून कुठल्याही प्रकार ची सन्मानाची वागणुक होत नसल्याने अहमदनगर जिल्ह्यात कार्यकर्त्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे .
दोन वेळेस झळ न लागता खासदार झालेल्यांना विकासात्मक दृष्टीकोन कसा राहणार शिर्डी लोकसभातंर्गत दहा वर्षात दलित समाज्याकरिता किती निधी वापरला ? असा सवाल करत वाकचौरे म्हणाले की , लोकांमध्ये राहून काम करणाऱ्यांलाचं समाज्याचे प्रश्न कळतात . तर रिपाईची ताकद वाढविण्याकरिता गांवा – गावांत प्रत्येक समाज्याच्या माणसाना बरोबर घेवून काम करणार आहोत कर्जत – जामखेड – श्रीगोंदा या तालुक्यामध्ये कार्यकर्त्याचे जाळे निर्माण करुन रिपाई पक्षाला उभारी देणार आहे त्याकरिता संजय भैलूमे सारखा तरुण कार्यकर्त्याला दक्षिण विभागाची जबाबदारी दिली आहे . कालातंरांने पक्षात पदाधिकारी बदलतचं असतात सुनिल साळवे हे मित्रचं आहे त्यांना राज्यावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे तर आता जुन्या नव्या कार्यकर्त्यानी पक्षाची ताकद वाढवावी असे आवाहन वाकचौरे यांनी शेवटी केले .
श्रीकांत भालेराव म्हणाले की , रिपाई पक्ष हा देश पातळीवरील पक्ष आहे कुठल्याही निवडी करताना पक्ष प्रमुखाच्या आदेशाने व नियमानेचं कारवाई होते . तर कार्यकर्त्याच्या भावना ही लक्ष्यात घेवून प्रत्येकाला काम करण्याची संधी उपलब्ध करावी लागते त्यामुळे वर्षानुवर्ष पदावर असणारे हे साहजिकचं नाराज होतात मात्र त्यांची नाराजी दूर करुन त्यांला बढती दिली जाते प्रत्येक कार्यकर्त्यानी हे ओळखले पाहिजेल की मागील कार्यकर्ता हा आपला छोटा भाऊ आहे . तेव्हा नुकत्याचं झालेल्या नविन निवडी बदल कोणी ही नाराज होवू नाही जुन्या जिल्हाध्यक्ष साळवे यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली जाणार आहे त्यामुळे दक्षिणेत कुठल्याही प्रकारे पक्षात नाराजी नसून कार्यकर्त्यामध्ये एकी आहे असे भालेराव यांनी सागितले . 

सुरेंद्र थोरात म्हणाले की , सर्व कार्यकर्त्याची एकचं इच्छा आहे रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा लढवावी त्यानुसार कार्यकर्ते कामाला ही लागले असून नुकत्याचं झालेल्या कोपरगांव श्रीरामपूर कार्यक्रमातून आठवले यांच्या कार्यकर्त्यामध्ये उत्सव दिसून आला आता पुन्हा अकोले , संगमनेर , नेवासा येथे कार्यक्रम होणार असून कार्यकर्त. कामाला लागले आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed