साकूर । झुंजार न्यूज
केदींय मंत्री ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत संगमनेर येथे ५ मार्च २०२४ होणार्या सामाजिक जातीय सलोखा परिषद , संविधान सन्मान सोहळा व कडूबाई खरात यांचा भीम गीताचा मैफील कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहाण्याचे गावो – गावी भेटी देत रिपाई कार्यकर्ते आवाहन करताना दिसत असून लोकांचाही उत्स्फूतपणे प्रतिसाद मिळताना दिसत आहे .

संगमनेर तालुक्यातील साकूर येथे झालेल्या सामाजिक सलोखा व कडूबाई खरात भिम गीत मैफली करिता लोकांना निमत्रंण बैठकी प्रसंगी कार्यकर्ते बोलत होते . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संरपच सचिन सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , ता कार्याध्यक्ष विजयराव खरात , युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे , शहराध्यक्ष कैलास कासार , मांग गारुडी आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल राखपसरे , वर्पे , संपत भोसले , भारत शेवाळे , नानासाहेब कदम , पास्टर सोनवणे , भाऊसाहेब माळी , गोविद सोनवणे , योगेश कर्डक , सिध्दार्थ खरात , गौतम सोनवणे , भारत भोसले , बाळासाहेब पवार , गौतम पवार आदीसह मोठ्या संख्येने महीला व कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी सुरेंद्र थोरात म्हणाले की , नगर जिल्हयात साकूर हे गांव मोठे आहे समाज वस्ती सुद्धा मोठी आहे मात्र येथील लोक सामाजिक प्रवाहात आलेचं नाही या पुढे लोकांनी सामाजिक प्रवाहात येवून सामाजिक दायित्व निभावून गावाचे नावलौकिक करा असे आवाहन करत आपण समाज्याच्या काही तरी देणे दारीतून काम केले पाहिजेल या पुढे पास्टरांनी संघटीत झाले पाहिजेल बाबासाहेबाच्या विचाराबरोबर संविधान सुध्दा चर्च मधून सांगा तर समाज्यात ऐक्य व परिवर्तन होईल . तर संध्या आरक्षणाकरिता मोर्चे निघत आहे आपल्याला मोर्चा न करता आरक्षण मिळाले त्यांची जाणीव धरा असे थोरात शेवटी म्हणाले तर

आशिष शेळके म्हणाले की , संगमनेर येथे ५ मार्चला सामाजिक जाती सलोखा परिषद होत असल्याने गावा – गावातून मोठ्या संख्येने महीलांनी , कार्यकर्त्यानी यावे हीचं खरी मोठी लढाई आहे . यातुन राजकिय परिवर्तनाची नांदी दिसणार आहे . रिपाई पक्षातील कार्यकर्ते सातत्याने अन्याय अत्याचारा विरोधात लढताना दिसत आहे कुठल्याही घडलेल्या गुन्ह्यात आरोपीला जात – पात नसते . जाती व्यवस्थेतून सामाजिक काम करणार्या नेहमी गावांतून विरोध होत असतो , ख्रिश्नन समाज्यांनी एकत्र येत बाबासाहेबांच्या विचाराबरोबर चला !

आज पर्यंत जिल्हयात अनेक घटना घडल्या मात्र या घटनेच्या विरोधात फक्त रामदास आठवलेचं धावून आल्याचे दिसून आले आहे . समाज्याची ध्येय धोरणे समोर ठेवून ५ मार्च होणार्या कार्यक्रमाना सर्व समाज्यातील लोकांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे .
यावेळी सचिन सोनवणे , अमोल राखपसरे , बाळासाहेब कदम , विजय खरात ,आव्हाड सर यांनी आपले विचार मांडले .
