संगमनेर । झुंजार न्यूज
शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागसवर्गीयकरिता राखीव झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना जनतेने संधी देऊनही १५ वर्ष कामाबाबत मात्र उदासीनता जाणवत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचा दावा काँग्रेसच्या प्रदेश महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी केला असून आजोबा दादासाहेब रुपवते पासून आम्ही कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहोत तर दादासाहेब यांचे योगदान सर्वश्रुत आहे.
संगमनेर येथील हॉटेल कृष्णा येथे पत्रकारांशी उत्कर्षा रूपवते बोलत होत्या .
उत्कर्षा रूपवते पुढे म्हणाल्या की शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्याने कामाचे संधी असताना उदासीनता आढळून येत आहे मतदारसंघ राखीव झाल्यावर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या कामावर जनता समाधानी नसल्याचे चित्र मतदारसंघात फिरत असताना दिसून येत आहे श्रीक्षेत्र अकाले ते श्रीक्षेत्र नेवासा, शिर्डी आशा धार्मिक दृष्ट्या
महत्त्वाचे तीर्थक्षेत्राचा समावेश असणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात भौगोलिक सौंदर्य असताना पर्यटनाच्या दृष्टीने काम झालेले नाही ते विकासाचे काम झाले असते तर अनेक प्रश्न सुटलेले दिसले असते. मतदारसंघाबरोबर परिसराचा विकास झाला असता बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते.
सध्याचे राजकारण दिशाहीन होत असून शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे शेतमालास भाव नाही शेतीपूरक जोडधंदे नाहीत त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे समन्यायी पाणी वाटप कायद्यात लक्ष घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी समन्वयाची भूमिका ठेवून हा प्रश्न हाताळणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही .
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फार्मुला तयार झाला असून कॉग्रेस पक्षाची शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असल्याने ही जागा कॉग्रेस पक्षालाचं मिळावी तसे झाल्यास जेष्ठ नेते आ बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथील उमेदवार निश्चित निवडून येईल असा विश्वास व्यक्त करत उत्कर्षाताई पुढे म्हणाले की ; माझ्या आजोबा दादासाहेब रुपवते , चौधरी यांच्यापासून आमची तिसरी पिढी कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहोत प्राध्यानक्रमाने शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आमचाचं हक्क असून श्रीमती सोनिया गांधी , राहुल गांधी व आ बाळासाहेब थोरात मला न्याय देतील व शिर्डी लोकसभा निवडणुक लढविण्यास संधी देतील . मिळालेल्या संधीचे सोनं करत , मतदार संघातील बेरोजगारी दूर करण्याचे प्रयत्न करत सर्वागीण विकासाचे ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून काम करणार . एक सक्षम पर्याय म्हणून मी पक्षाकडे निवडणूक साठी आग्रह धरणार असून तरुणांना कॉग्रेस पक्षानी संधी द्यावी
Post Views: 1,584
