संगमनेर । झुंजार न्यूज
केद्रींय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणारा सामाजिक सलोखा परिषद या होणार्या कार्यक्रमात सामाजिक , राजकिय क्षेत्रात ” रिपाई तरुणांई ऐक्य ” दाखविण्याकरिता तालुक्यातील ग्रामिण व शहरातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाई युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोंडे यांनी केले आहे .
मंगळवार दि ५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी केद्रींय मंत्री ना रामदास आठवले व महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळा व प्रसिध्द गायिका कडूबाई खरात यांच्या भीम गीताचा कार्यक्रम होणारा असून या कार्यक्रमाचे नियोजन प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , तालुकाध्यक्ष आशिष शेळके , शहराध्यक्ष कैलास कासार , कार्याध्यक्ष विजय खरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते गावो – गावी , वाड्या – वस्त्या व घरो – घरी जावून कार्यकर्ता निमत्रंण पत्रिका पोहवित असून कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करताना दिसत जाहे .
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी , उंबरी , ओझर , जोर्वे , कनोली , मनोली , कोल्हेवाडी , निमगांव जाळी आदी गावांत जावून कार्यकर्त्याच्या बैठका घेवून होणाऱ्या कार्यक्रमांचे महत्व सांगत योगेश मुन्तोंडे कार्यकर्त्याना व विविध समाज्यातील लोकांना कार्यक्रमांचे निमत्रंण देत आहे .

यावेळी तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम , तालुका सरचिटणीस सुधाकर कदम , गौरव मुन्तोंडे , निलेश मुन्तोंड , साईल मुन्तोंडे , सुशांत फुलपगार , दुर्लभाई मुन्तोंड , बबलू भाई मुन्तोंडे , प्रशांत फुलपगारे , दीपक मुन्तोंडे , सुनील मुन्तोंडे , स्वप्निल कदम , समीर शेख , रोहित मुन्तोंडे , सायाभाऊ शिंदे , सागर पगारे , विजू चव्हाण , मनोज चव्हाण , मनोहर जाधव , बाळाभाऊ कुठे , नितीन चव्हाण , राजेश गायकवाड पत्रकार आदी उपस्थित होते



