अकोले । झुंजार न्यूज 

अकोले तालुक्यातील कोतुळ येथील कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केंद्रिय निवासी अनु. जमाती प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा व शाहु, फुले, आंबेडकर निवासी अनु. जाती प्राथमिक आश्रमशाळा या नवीन शिक्षण संकुलाचे (इमारत) उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक ५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांच्या हस्ते तर महसूल मंत्री ना. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व रिपाई राज्य उपाध्यक्ष तथा कोतुळेश्वर शि. प्र. संस्थेचे अध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती सचिव सुमित गीते , कल्पित वाकचौर यांनी दिली .
यावेळी खा. सदाशिवराव लोखंडे , आ. डॉ. किरणजी लहामटे , आ सत्यजीत तांबे , रिपाई संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , वैभवराव पिचड , रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , शिवाजीराजे धुमाळ , अगस्ती कारखाना चेअरमन सिताराम पा. गायकर , मधुकरराव तळपाडे , पांताधिकारी शैलेश हिंगे , सिद्धार्थ मोरे , रावसाहेब वाकचौरे , सुरेशराव कोते , बाजीराव दराडे ,सुधाकरराव देशमुख , सुरेशराव गडाख , यशवंतराव आभाळे ,  चेतन नाईकवाडी , हेमंत (बबलु) देशमुख , राजेंद्र देशमुख , सुनिल गिते , विनोद देशमुख , मधुकरराव नवले , अमितजी भांगरे ,  गुलाबराव पाटील , राजन पाटील , बी. जे. देशमुख , मच्छिंद्र धुमाळ , मनोज देशमुख , सागर शिंदे पत्रकार , संजय देशमुख , मच्छिंद्र धुमाळ , मनोज देशमुख , सिताराम भांगरे ,  अॅड. बी.जी. वैद्य , अरविंद देशमुख , विकास वाकचौरे , जालिंदर वाकचौरे , डॉ. अजित नवले , सिताराम देशमुख , संभाजी भिंगारे , रामनाथ मंडलिक सर , मच्छिंद्र देशमुख ,  फारुक पठाण , शिवाजीराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
तरी होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष महेश होलगीर ,कल्पित वाकचौरे , खजिनदार सुनील देशमुख , सौ. मिनाताई गिते , अॅड. आर. आर. पवार , चिमाजी उंबरे , आण्णासाहेब बेळे , सुमित गिते , सुरेश देशमुख , सुरेश बळे , रविना कल्पित वाकचौरे , डॉ भाऊसाहेब एन. गिते आदींनी केले आहे . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *