संगमनेर । झुंजार न्यूज

बऱ्याचं दिवसानंतर संगमनेरमध्ये केद्रींय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले व महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ” सामाजिक सलोखा परिषद ” व ” संविधान सन्मान सोहळा ” मंगळवार दि ५ मार्च २०२४ रोजी होत असल्याने हा कार्यक्रम अविस्मरणीय व्हावा याचं हेतुने तरुण कार्यकर्त्यांनी गावो गावी जावून निमत्रंण दिले तरी हा कार्यक्रम अविस्मरणीय होणार असल्याने जिल्हासह संगमनेर तालुक्यातील बहुजन समाज्यातील महिलासह वयोवृद्ध , तरुणांना व कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन रिपाई संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी केले आहे . 

 

यावेळी श्रीकांत भालेराव पुढे म्हणाले की , ना.रामदास आठवले व ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून बहुजन समाज्यात ऐक्याची भावना टिकण्याकरिता सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन करण्यात आले त्याचं बरोबर प्रसिध्द गायिका कडूबाई खरात यांचा भीम गीताचा मैफिलांचा कार्यक्रम होणार असून संपूर्ण कार्यक्रम हा प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष आशिष शेळके , शहराध्यक्ष कैलास कासार , युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य व्हावा म्हणून तरुण कार्यकर्ते निमत्रंण पत्रिका घेवून घरा – घरात , वाड्या – वस्त्या व गावो गावी जावून कार्यक्रमास येण्याचे आवाहन केले यातूनचं तरुणांनाची एकजुठीने कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून येत आहे . या कार्यक्रमास राज्यातील रिपाईचे सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातून भाजपा , राष्ट्रवादी (अजीत पवार गट) , शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी उपस्थितीत रहाणार आहे . 

 
संगमनेर तालुक्यातील तळेगांव , साकुर , आश्वी , धांन्दरफळ या गटासह राहाता , कोपरगांव , श्रीरामपूर , अकोले , नेवासा , राहुरीसह दक्षिण नगर मधील विविध समाज्यातील लोकांना व कार्यकर्त्यांना  निमत्रंण पत्रिका पोहचल्या, रिपाईच्या कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्याची धावपळ करताना दिसत आहे . यातूनचं रिपाईचे एकीच बळ दिसून येणार असल्याने संगमनेर तालुक्यातील वाड्या – वस्त्या मधून महीलांनी , तरुणांनी मोठया संख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी केले
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *