झरेकाठी । झुंजार न्यूज
लोणी येथे शिक्षण घेत असलेले ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या ऋतिका अनाप,अनुजा लवांडे,समृदधी थोरात,शिवानी कडु , ईश्वरी आवाशंक ह्या विद्यार्थीनी विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय लोणी येथे विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. संचालिका कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय व कृषी महाविद्यालय लोणीच्या प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम अनाप, डॉ. दिपाली तांबे व प्रा.संदीप पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकऱ्यांना बियाणे टॅग, रंग,विश्लेषण याची माहिती सांगण्यात आली.
शेतीसाठी शुद्ध बियाणे अत्यंत महत्वाचे असून शेतकऱ्यांची चांगल्या वाणाचे बियाणे मिळवण्यासाठी नेहमीच धड़पड़ असते.हंगामाच्या सुरुवातीला नेहमीच बियाण्यांची मागणी वाढत असल्याने भेसळ ,कमी अनुवंशिकता शुद्धता असलेल्या व कमी दर्जाच्या बियाणांना पेव फुटते व फसवनुकही होते.अधिसूचित जातीच्या बियाण्याची विक्री करताना बियाण्याच्या बॅगवर बियाणे कायद्यामध्ये निर्देशित केलेल्या बियाणे प्रतीच्या कमीतकमी मूल्याच्या दर्जा दाखवणारी माहिती टॅग असणे आवश्यक आहे . बियाणे प्रकारानुसार योग्य त्या रंगाचा प्रमाणित टॅग असावा. उदा. पायाभूत बियाण्यासाठी पांढरा ,प्रमाणित बियाण्यासाठी नीळा,मुलभुत बियाण्यासाठी पिवळ्या रंगाचा ,तर सत्यप्रत बियाण्यासाठी हिरव्या रंगाचा टॅग असतो.
यावेळी सावित्रीबाई निकम,मयूरी कोठाळे,वर्षा बर्डे ,सुरेश वाणी आदी उपस्थित होते.
