झरेकाठी । झुंजार न्यूज
लोणी येथे शिक्षण घेत असलेले ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या ऋतिका अनाप,अनुजा लवांडे,समृदधी थोरात,शिवानी कडु , ईश्वरी आवाशंक ह्या विद्यार्थीनी विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय लोणी येथे विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. संचालिका कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय व कृषी महाविद्यालय लोणीच्या प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम अनाप, डॉ. दिपाली तांबे व प्रा. अक्षया वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकऱ्यांना अझोला शेती व त्याचे फायदे याची माहिती सांगण्यात आली .
अझोला हे पाण्यावर वाढणारे जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते नेचे वर्गीय वनस्पती आहे . पशुपालनासाठी अझोला महत्वाचे पीक आहे .पशुखाद्यात अझोलाचा वापर केला तर असे खाद्य किफायतशीर व पौष्टिक बनते .दूध देणाऱ्या जनावारांना महागड्या खाद्या ऐवजी अझोला खाण्यास दिला तर दूधाची गुणवत्ता व प्रत वाढते . यावेळी एकनाथ वाणी, रायभान वाणी, संतोष वाणी आदी उपस्थित होते.
