रिपाई – शिंदे गट – भाजपा – मनसेच्या शैर्यतीत बौद्ध समाज्याला वंचित ठेवण्याचे धोरण ! 

शिर्डी । झुंजार न्यूज 

२०२४ लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यातील अनेक लोकसभेच्या जागांचा महायुती आणि महाविकास आघाडीचा तिढा अजून सुटता – सुटेना त्यामध्ये शिर्डी लोकसभेची देखील जागा आहे. जागा वाटपाचा तिढा सुटण्याआधी रिपाई कार्यकर्त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे महायुतीची डोकेदुखी वाढत असताना एका भाजपा वरिष्ठ नेत्यांनी नाशिकच्या नेत्याला भाजपाकडून निवडणुक लढविण्याची गळ घातली तर दुसरीकडे मनसेने ही शिर्डीच्या जागेची मागणी केल्याने आता मात्र गुंता वाढणार असल्याचे चित्र दिसत असून आठवले यांना डावललून पुन्हा एकदा बौद्धांना वंचित ठेवण्याचे धोरण दिसत आहे . शिर्डीची जागा जर रिपाईला सुटली नाही तर रिपाई पदाधिकारी आक्रमक भूमिका घेण्याच्या पावित्र्यात दिसत आहे .

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची साथ देणा-या रामदास आठवलेंना डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून बोलली जात आहे . शिर्डी लोकसभेची जागा आठवलेंना द्यावी याकरिता मेळावे , बैठका होताना दिसत आहे मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने अहमदनगरसह शिर्डीत अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा अहमदनगर जिल्ह्यातील रिपाई गटाने दिलाय.अहमदनगर जिल्ह्यातील रिपाई आठवले गटाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकतीचं झालेल्या श्रीरामपूर येथील बैठकीतून हा निर्णय घेतला . 

रामदास आठवले यांनी अनेक महिन्यांपासून सोलापूर आणी शिर्डीच्या जागेची मागणी करत आहे मात्र भाजप याकडे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जर शिर्डी ही जागा दिली नाही तर रिपाई कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्धार व्यक्त करत आहे. असे झाले तर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता असताना सुद्धा नगर जिल्ह्याला तथा राज्याचे भाजपा वरिष्ठ नेत्यांनी नाशिकच्या नेत्याला भाजपाकडून लढा असा असे संकेत दिल्याची संध्या चर्चा आहे . यापुर्वी शिर्डीमधून भाजपाच्या कार्यकर्त्यानी आम्हाला लोखंडे नको भाजपाने आपल्या पक्षाचा उमेदवार दयावा अशी मागणी केली होती त्या मागणीस भाजपा नेत्यांचीही सहमती दिसून आली आहे तर नुकतेचं मनसे नेते राज ठाकरे यांनी अमित शहाची भेट घेत भाजपाबरोबर येण्याची तयारी दर्शविली त्यात लोकसभेच्या दक्षिण मुंबईसह शिर्डीची ही जागेची मागणी केली या वरुन असे दिसून येते की , काना मागून आले अन् तिखट झाले . रामदास आठवले यांच्या रिपाईने गेल्या १३ वर्षापासून प्रामाणिकपणे मैत्रीचे संबंध ठेवले असून अनेक दिवसापासून आपण शिर्डीतून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहे मात्र याकडे भाजपा व नेत्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे . शिर्डी मतदारसंघ हा २००९ पासून मागसवर्गियांकरिता राखीव झाला असून बौद्धांची जवळ जवळ ४ ते ५ लाखांची संख्या असताना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत नसल्याची मोठी शोकांतिका आहे . अन्याय अत्याचार झाल्यावर सर्वात प्रथम उभा राहतो व विविध आंदोलने , मोर्चे करिता उभा राहणारा बौद्ध समाज्याला राजकिय प्रतिनिधीत्वापासून का ? वंचित ठेवले जाते हेचं कळत नाही .

संपुर्ण राज्यातील इंडिया आघाडी व भाजपा युतीने आप – आपले उमेदवार घोषीत करण्याचे काम सुरु केले मात्र शिर्डी अद्याप उमेदवार निश्चित होत नसल्याने राज्याचे लक्ष लागले असून आता भाजपाचा नको , मनसेचा नको , शिवसेना ( शिंदे ) नको , आता केवळ रामदास आठवले यांनाचं उमेदवारी , ही भूमिकेवर कार्यकर्ते ठाम संपूर्ण जिल्हयातून बौद्ध समाज्याचे कार्यकर्ते आक्रमक आता केवळ बौद्धालाचं उमेदवारी अन्यथा वेगळा विचार !

समाजाला आठवलेंना शिर्डीचा खासदार म्हणून पहायचे आहे

पक्षाचे नेते रामदास आठवले देशभरात भाजपसोबत आणि एनडीए सोबत काम करतात, म्हणून आरपीआय पक्षाला शिर्डीची जागा मिळावी अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत. भाजपने ते गांभीर्याने घेतले नाही, परंतु भाजपने आम्हला जागा दिल्या नाही तर निश्चित पणे त्याचा तोटा त्यांना होईल. कार्यकर्त्यांची आणि समाजाची भावना लक्ष्यात घेवून मागून आलेल्यांना उमेदवारी देवू नये प्राधान्य क्रमाने रिपाई पक्षाचा विचार व्हाव आता रामदास आठवले शिर्डी लोकसभेचे खासदार म्हणून पाहायचे आहे. आम्हाला अपक्ष उमेदवारी करण्याची वेळ येवून देवू नका असा इशारा आशिष शेळके यांनी दिला आहे.  
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed