साकूर । झुंजार न्यूज
या गंभीर घटनेचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवावा, तसेच यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर ते बोलत होते. पोलिसांकडून झालेला हलगर्जीपणा आणि या भागात असलेली दहशत आणि लागोपाठ घडत असलेल्या अशा घटनांमुळे मुलींना शाळा-महाविद्यालयांत पाठविण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे, मुलीचे आई-वडील तसेच नातेवाइकांनी निदर्शनास आणून दिले. तपास योग्य दिशेने व्हावा तसेच यातील शेवटचा गुन्हेगार सापडेर्पत आपण तुमच्या बरोबर ठामपणे राहू, अशी ग्वाही विखे यांनी दिली.
या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास होण्याची अपेक्षा व्यक्त करून फिर्याद द्यायला गेलेल्या पालकांना रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवणे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे ठाणे अंमलदार कोण होते, इथपासून ते आरोपींना कोणाकोणाचे फोन आले. ते कोणाच्या संपर्कात होते, याचा तपास करण्यासाठी त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची गरज आहे. या आरोपींना राजाश्रय देऊन अशी प्रकरणे मिटवली जात असतील, तर ही गंभीर बाब आहे, असा विखे पाटील म्हणाले.
