कर्जत । झुंजार न्यूज
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना शिर्डीची जागा सोडावी अशी मागणी आरपीआय च्या बैठकीत करण्यात आली अन्यथा कार्यकर्त्यांना वेगळा विचार करून अहमदनगर दक्षिणेत उमेदवार उतरवावा लागेल असा इशारा देण्यात आला.
2009 मध्ये रामदास आठवले यांनी
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी तेव्हा पासून कार्यकर्ते गावोगावी जाऊन जनसामान्यांच्या समस्या सोडवत आहेत.
सद्या आरपीआय भाजपा बरोबर महायुतीत सहभागी आहे त्यामुळे भाजपने आपल्या मित्र पक्षाला राज्यातील शिर्डी व सोलापूर या दोन जागा सोडाव्यात यातील शिर्डी मधून राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीयमंत्री रामदास आठवले हे उमेदवारी करतील. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून आरपीआयच्या वतीने सातत्याने मागणी केली जात आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने मित्रपक्षा बरोबर (आरपीआय) एक ही बैठक घेतली नाही.
राज्यात एक ही समितीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. भाजपाला कोणत्याही कार्यक्रमामध्ये आठवले सह कार्यकर्त्यांचा ही विसर पडतो. निवडणूक आली की मगच सर्व कार्यकर्ते आठवतात त्यामुळे यावेळी आर पी आय च्या कार्यकर्त्यांनी कठोर भूमिका घ्यावी अशी भावना आर पी आय च्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची असून तसे झाले नाही तर अहमदनगर दक्षिण मध्ये उमेदवार देऊन रिपाइं कार्यकर्ते भाजपच्या विरोधात काम करतील असा इशारा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश (आण्णा) भैलुमे यांनी दिला आहे.
यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी अहमदनगर द. मध्ये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली व विजय वाघचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर दक्षिण मध्येमेळावा घेण्यात येईल अशी माहिती भैलुमे यांनी दिली
