वायुसेनेचे मिलिंद म्हसे यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांत देशप्रेमाचे स्फुरण

सात्रळ । झुंझार न्यूज

सात्रळ येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय वायुसेनेचे  मिलिंद म्हसे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा पाहायला मिळाली.

यावेळी श्री. मिलिंद म्हसे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीताने संपूर्ण शालेय परिसर देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये म्युझिकल ड्रिल, देशभक्तीपर गीते आणि पूर्व-प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी सादर केलेले आकर्षक नृत्य विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या भूमिका प्रभावीपणे मांडल्या, ज्यातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, शिस्त आणि सांघिक भावना दिसून आली.


यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. के. के. बोरा, कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल बोरा, सचिव सतिष गांधी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. अर्चना बोरा यांच्यासह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर राष्ट्रप्रेम आणि शिस्तीचे संस्कार रुजवण्यासाठी मान्यवरांनी प्रेरणा दिली .


शाळेच्या प्राचार्या सुरेखा घुले म्हणाल्या की , “विद्यार्थ्यांनी देशाचा आदर करावा, चांगले संस्कार आत्मसात करावेत आणि भविष्यात राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यावे,” असे आवाहन केले.

भारतीय वायुसेनेतील आपले अनुभव सांगताना श्री. मिलिंद म्हसे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, समर्पण आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व पटवून दिले. “देशाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा हीच खरी देशभक्ती आहे,” असे विचार त्यांनी मांडले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.

कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. या सोहळ्यामुळे आनंद गुरुकुल शाळेच्या परिसरात राष्ट्राभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *