बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनाने जिल्हा महासचिव सोमनाथ भैलुमे यांनी धरणे आंदोलन मागे घेतले !

 

कर्जत । झुंजार न्यूज

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीग्रह इमारतीला दर्शनीय ठिकाणी स्टीलच्या अक्षरात नामकरण फलक लावण्या बाबत वंचित बहुजन युवा आघाडी वतीने जिल्हा महासचिव सोमनाथ भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते, परंतु त्या अगोदरच संबंधित प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता वाकचौरे साहेब यांनी वेळीच दखल घेऊन सदर कामासाठी शासकीय विश्रामगृह नामफलक पाहणी अहवाल सादर करून अंदाज पत्रक समाज कल्याण कार्यालय अहमदनगर यांच्याकडे सादर करून याकरिता आवश्यक निधीची तात्काळ मागणी केली आहे, काही दिवसात कामाला सुरुवात केली जाईल असे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी आश्वासन दिले.

 

ही सर्व प्रक्रिया आंदोलन पुर्वी झपाट्याने पुर्ण होत असल्याचे दिसून आले असता तसेच याबाबत लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले असता या सर्व हालचाली वेगात सुरू आहेत असे दिसून येताच संबंधित धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे जिल्हा महासचिव सोमनाथ भैलुमे यांनी यावेळी सांगितले.

प्रा. विक्रम कांबळे सर जिल्हा संघटक संजय शेलार , फादर कमिटी जिल्हा सल्लागार चंद्रकांत डोलारे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद शिंदे,लखन पारसे जिल्हा सचिव तुकाराम पवार प्रमुख संघटक भाऊ ऊर्फ शिवानंद पोटरे, जिल्हा सहसल्लागार अंकुश साळवे, जिल्हा प्रवक्ता श्रीनिवास गजरमल ,सामाजिक नेते बंडा भैलुमे , तालुका अध्यक्ष पप्पू चव्हाण महीला तालुका अध्यक्षा रुपालीताई राशीनकर कर्जत शहर नेते विकास समुद्र ,गोदड समुद्र, तालुका सचिव पोपट कांबळे, दुसरे तालुका सचिव नामदेव गलांडे, जिल्हा मागासवर्गीय विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष कुलदीप गंगावणे, कर्जत शहर शाखा अध्यक्ष राहुल पोळ,थेरवडी शाखा अध्यक्ष मधुकर कांबळे, धालवडी शाखेचे नेते तात्यासाहेब चव्हाण कोंभळी शाखेचे नेते कुलदीप शेलार नांदगाव शाखेचे नेते दिपक ससाणे , प्रदीप समुद्र मिरजगाव शहर शाखा नेते दत्ता घोडके अशी अनेक पदाधिकारी यावेळी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते

संबंधित विषयी दर्शनीय ठिकाणी स्टीलच्या अक्षरात नामकरण फलक लावण्या बाबत संबंधित प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे साहेब , कर्मचारी संतोष कुरुळे साहेब तसेच वसतिगृह कर्मचारी साळवे साहेब , कांबळे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून या कामात विलंब झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा महासचिव सोमनाथ भैलुमे यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे साहेब यांना दिला आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed