आरोपींना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी

 

संगमनेर / झुंजार न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील साकूर येथे घडलेल्याबलात्कार प्रकरणी आपली बदनामी होईलया भीतीने एका अल्पवयीन विद्यार्थिनी आपली जीवन यात्रा संपवली. याविद्यार्थिनीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या चौघा नराधमांची संगमनेर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी साडेसातवाजता साकूर येथे धिंड काढली. आरोपींकडून साकूर येथे आणून त्यांच्याकडेया प्रकरणाचा तपास केला. दरम्यान, अारोपींना पाहण्यासाठी सुमारे दीड हजार नागरिकांनी गर्दी केली होती.

 

पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्यामार्गदर्शनाखाली घारगाव पोलिसांनी सौरभखेमनर मुख्य आरोपी, त्याला साथ देणारेसह आरोपी योगेश रामा खेमनर, प्रशांतभास्कर खेमनर, या आरोपींना घटनास्थळी आणले होते. यावेळी लोकांमध्ये संतप्तभावना होती. बुधवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्याचित्रा वाघ, काँग्रेस युवानेत्या डॉ जयश्रीथोरात महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षारुपवते, अंनिसच्या राज्य सचिव रंजनागवांदे, आदींनी पीडित अत्याचारीतकुटुंबाला भेट दिली.

 

या घटनेतीलआरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचीमागणी केली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीतपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे. यातील चार आरोपींना चेहरे उघडे ठेवूनघटनास्थळी आणण्यात आले होते.

 

ज्या परिसरात मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न आरोपी करत होते. या भागातूनही याआरोपींना नेण्यात आले होते. या संदर्भात पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरेयांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिसठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर वत्यांचे सहकारी पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, विविध संघटनांनी या घटनेचा तीव्रनिषेध व्यक्त केला आहे. आरोपींना जामीन मिळाला नाही पाहिजे पीडित कुटुंबीयांना संरक्षण व मदत मिळावी, अशी मागणीतालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात यांनी केली आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *