केद्रींय मंत्री रामदास आठवले यांचे दूरध्वनी वरुन पिडीत कुटुंबियांचे सांत्वन तर न्याय मिळवून देण्याची ग्वाही !
साकूर | झुंजार न्यूज
साकूर येथील घटना ही दुर्दैवी असून साकूर हे गांव संगमनेर तालुक्यातील सामाजिक , राजकिय , व्यापारिक दृष्टीने सक्षम असताना ही येथे पोलिस स्टेशन नसणे ही दुर्दवी आहे त्यामुळेचं गुन्हेगारी फोफावली असून येथे गुन्हेगारी वाव मिळू नये म्हणून तातडीने पोलिस स्टेशन व्हावे अशी मागणी करत या घटनेतील नराधमांना फाशीचीचं शिक्षा मिळावी म्हणून शासनाने उज्ज्वल निकम सारख्या सरकारी वकीलांची नियुक्ती करावी अशी मागणी रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळक यांनी केली .
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर येथील तास्करवाडीतील इयत्ता १० वी शिकणार्या मुली एका नराधमाने साथीदारांच्या मदतीने अत्याचार केल्याने भयभीत झालेल्या त्या मुलीने आपली जीवन यात्रा संपविली त्या पिडीत कुटुबांला केद्रींय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने रिपाईच्यावतीने भेट देण्यात आली यावेळी शेळके बोलत होते .
यावेळी तालुका कार्याध्यक्ष विजयराव खरात , उपाध्यक्ष बाळासाहेब कदम , मांग – गारुडी आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल राखपसरे , रंभाजी कुंदनर , संपत भोसले , मराठा आघाडी तालुकाध्यक्ष गौतम वर्पे , पत्रकार राजेश गायकवाड , गोविंद सोनवणे , सिद्धार्थ भोसले अविनाश सोनवणे , दिनकर खरात आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी शेळके पुढे म्हणाले की , साकुर गांवाचा परिसर फार मोठा असून वाड्या – वस्त्या या दूरवर आहे येथील मुलांना शाळेला येण्याकरिता फार कसरत करावी लागते तर साकूर गांवात बाजारपेठ असल्याने सर्व वाड्या – वस्त्यांचा व्यवहार हा साकूर मध्येचं होतो अनेक वर्षापासून हा परिसर राजकिय दबावाखाली आहे त्यामुळे पोलिस स्टेशन होवू शकले नाही . त्यामुळे दहशती निर्माण झाल्या शाळेच्या आवती – भोवती मोठ्या प्रमाणात तरुणांचे टोळक्याचे साम्राज्य असून गाड्यावर इकडून – तिकडे चकरा मारत मुलीना त्रास देताना दिसत असल्यानेचं मुली या दहशतीखाली वावरतांना दिसत आहे यांच परिसरात अनेक घटना घडून गेल्या मात्र राजकिय दबावातून त्या नाहीश्या केल्या आज साकूर मध्ये पोलिस स्टेशनची फार आवश्यकता असल्याने २० – २५ कि मी अंतरावर घारगांव पोलिस स्टेशन असल्याने गुन्हा घडल्यावर पोलिसांना येण्यास विलंब होतो अशी भावना लोकांमधून व्यक्त होत आहे तर पिडीत कुटुंबाची परिस्थिती फार हलाखीची असल्याने त्यांना शासनाकडून आर्थिक मदतीची गरज आहे .
चौकट
साकूर येथील घटना गंभीर असून घटनेचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवावा, तसेच यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी व मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत व साकूर मध्ये पोलिस स्टेशन दयावे यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केद्रींयमंत्री रामदास आठवले यांनी दूरध्वनीवरुन सांगितले. तर पीडितेच्या कुटुंबीयांचे दूरध्वनीवरुन सांत्वन करत मी तुमच्या पाठीशी न्याय मिळूपर्यंत उभा राहील असे आठवले यांनी सांगितले .