ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ घ्यावी, या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘डिजिटल क्लासरूम’ उभारण्यात आले आहे. या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात संपन्न झाले.
यावेळी संदिपराव घुगे , पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय म्हसे, ॲड. सौ. रोहिणी निघुते, दीपक सोनवणे, मनोज मेहेरे, अनिल गायकवाड, प्रवीण शेपाळ , अशोक जऱ्हाड , शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कुदनर, श्रीमती लता बिडवे, श्रीमती विजया लांडगे आणि श्री. मेचकर यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ना. विखे पाटील यांनी प्रत्यक्ष डिजिटल क्लासरूमची पाहणी करत. वर्गातील मुलांशी संवाद साधला . मुलांना काही प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही न डगमगता विचारलेल्या प्रश्नांची अत्यंत समर्पक आणि अचूक उत्तरे दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ही चमक आणि त्यांच्यातील आत्मविश्वास पाहून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
डिजिटल क्लासरूममुळे आता आश्वी बुद्रुकमधील विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमांतून शिक्षण घेता येणार असून, यामुळे त्यांच्या गुणवत्तेत अधिक भर पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.