{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

गुळवे कुटुंबीयांचे आमदार अमोल खताळ सांत्वन करत दिला धीर

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

 

संकटाच्या या कठीण प्रसंगी गुळवे कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आपण सहभागी असून, शासनाच्या माध्यमा तून कुटुंबाला योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी गुळवे कुटुंबीयांना दिला.

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे शेततळ्यात पडून श्रवेश संतोष गुळवे (वय १३) व त्याचे आजोबा पांडुरंग रखमा गुळवे (वय ६५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने गुळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार खताळ यांनी गुळवे कुटुंबीयांच्या निवास स्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, भाजपचे उपाध्यक्ष बाळासाहेब शेटे, सरपंच अनिता नेहे संतोष गुळवे सुरेश भालेराव सुधाकर नेहे लक्ष्मण नेहे सोमनाथ जगदाळे परसराम नेहे रावसाहेब थिटमे योगेश कचरे संजय नेहे नवनाथ नेहे रघुनाथ गुळवे कचरू दुधवडे ग्रामपंचायत अधिकारी मनिषा शिखरे संगमनेर खुर्दचे मंडलधिकारी विश्वजीत चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

आमदार खताळ म्हणाले, श्रवेश गुळवे हा शाळेत शिक्षण घेत असल्याने त्याच्या कुटुंबाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच पांडुरंग गुळवे यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून शासनाची मदत मिळावी, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुळवे कुटुंबाला शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *