परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय मुख्य वक्ते व विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग – प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश

संगमनेर । झुंजार न्यूज

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय गेली ४१ वर्षे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाची परंपरा हे महाविद्यालय विविध उपक्रमाद्वारे जपत आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्य विकासासाठी नवनवीन उपक्रम महाविद्यालय द्वारे सतत राबविले जातात. महाविद्यालयाला चार वेळा एनबीए चे मानांकन व दोनदा नॅक ए व ए+ मुल्यांकन मिळाले आहे. संगणक अभियांत्रिकी विभागतर्फे “फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ओन रिसेंट ट्रेंड्स ॲन्ड ॲडव्हान्समेंट इन कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी” पहिली आंतरराष्ट्रीय परिषद २६ आणि २७ एप्रिल, २०२४ ला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी दिली.
   
पहिली आंतरराष्ट्रीय परिषदेच्या वेबसाईट व माहिती पत्रकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वेंकटेश यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे, अशी माहिती संगणक विभाग प्रमुख डॉ. एस.के सोनकर यांनी दिली . डॉ. सोनकर पुढे बोलताना म्हणाले, परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय मुख्य वक्ते म्हणून डॉ. व्हीओलेता (प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, एस.एस. सिरिल आणि मेथिडियस विद्यापीठ, स्कोप्जे, मॅसेडोनिया) व डॉ. नदीन अक्करी ( सहयोगी प्राध्यापक, जेद्दाह इंटरनॅशनल कॉलेज, सौदी अरेबिया) लाभले आहे . सदर परिषदेसाठी विविध देशातून ,राज्यातून ३०० शोधनिबंधानी आता पर्यंत सहभाग नोंदवला आहे . उच्च प्रतीचे शोधनिबंध हे युजीसी केयर जर्नल साठी निवडण्यात येणार आहे . परिषदेची सविस्तर माहिती

 

icrtact2024.avcoe.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे . 
डॉ. एस. ए. ठाणेकर हे समन्वयक,तसेच डॉ. आर. जी. तांबे व डॉ. डी. आर. पाटील हे सह-समन्वयक म्हणून काम बघत आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राज्याचे माजी महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात , विश्वस्त आ. डॉ. सुधीरजी तांबे , विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे ,डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. जे. बी. गुरव , प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही.पी. वाघे आणि संगणक विभाग प्रमुख डॉ. एस.के.सोनकर व सर्व शिक्षक – विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *