शिर्डी । झुंजार न्यूज
2009 पासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा मागसवर्गियाकरिता राखीव झाला तसे या मतदारसंघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक स्थळ असताना गेल्या १५ वर्षात बेरोजगारी , पाणी आदी समास्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या तर दूध व शेतीमाला हमी मिळत नससल्याने शेतकरी वर्ग हैराण झाले तसेच पाहिजेल तसा या मतदारसंघाच विकास झाला नसल्याची खंत व्यक्त करत आता तरुणांना संधी मिळाली पाहिजेल असे मत सामाजिक कार्यकर्ते तथा उदयोजक नचिकेत रघुनाथ खरात यांनी व्यक्त केली .
सन 2009 साली शिर्डी लोकसभा मतदार संघ मागासवर्गीय समाजासाठी आरक्षित झालं. 2009-2014 या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेकडून श्री. भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसचे उमेदवार श्री. रामदास आठवले यांचा पराभव करून निवडून आले.
2014-2019 या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार असलेल्या श्री. सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसच्या श्री. भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला आणि निवडून आले. सन 2019-2024 या तिसऱ्या लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार खासदार श्री. सदाशिव लोखंडे यांनी माजी आमदार श्री. भाऊसाहेब कांबळे यांचा पराभवकरुन दुसऱ्यांदा खासदार झाले.
मतदार बंधु भगिनींनो, श्री. भाऊसाहेब वाकचौरे व श्री. सदाशिव लोखंडे या पैकी एका उमेदवाराने पाच वर्ष राजकीय कारकीर्द उपभोगली तर श्री. सदाशिव लोखंडे यांनी तब्बल 10 वर्ष सत्ता उपभोगली मात्र या दोघांकडून देखील मतदार संघाचा जो विकास व्हायला हवा होता तो मात्र झाला नाही. त्यांच्या बाबतीत शिडीं मतदार संघात कमालीची नाराजी आहे. आणि ही नाराजी मतदार संघातील लोकांकडून उघड उघड बोलली जात आहे.
लोकप्रतिनिधी हे जनतेचं जीवन सुखकर करण्यासाठी असतात, जनतेसाठी सोई सुविधा निर्माण करण्यासाठी असतात. रोजगार, शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आधी सकारात्मक बदल करण्यासाठी असतात परंतू राजकीय पक्षांची इतकी वाईट अवस्था असावी की पर्यायी म्हणून आपण नवा आश्वासक चेहेरा देऊ शकू नये आणि जनतेला देखील किती गृहित धरावे की जनतेचं काहीही म्हणणं जरी असलं तरी आम्ही तेच तेच उमेदवार पुन्हा पुन्हा तुमच्यावर लादणार आणि हे अजून किती दिवस चालणार. दिवसामागून दिवस जाताय, वर्षामागून वर्ष जातायत पण तुमच्या आमच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल झालाय, यातुन माझ्या तरुणांना काय भेटले माता भगिनींना काय भेटले माझ्या शेतकरी बांधवांना काय भेटले, कष्टकरी बंधु भगिनींना काय भेटले या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधन गरजेचं आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर
बोलुन खरच आपले स्थानीक प्रश्न सुटनार आहेत का ?
तेव्हा मतदार बंधूनो मी श्री. नचिकेत रघुनाथ खरात आपणास नम्र आवाहन करत आहे की, मी BSW, MSW असा उच्चशिक्षित तरुण असून मी आपल्या शिर्डी मतदार संघासाठी अनेक विकासात्मक, विधायक कामे करण्याचा माझा मानस आहे. मा. आजी माजी खासदार महोदयांएवढी
आर्थिक धनसंपदा माझ्या जवळ नाही, हे नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देणे मला क्रमप्राप्त वाटते आहे. मतदार संघातील विकास हे माझे स्वप्न आहे. समाजाच्या मदतीला धावून जाणे, मतदार संघाचा विकास करणे म्हणजेच “असा हवा खासदार नवा” या उक्तीप्रमाणे आपल्या मतदार संघात परिवर्तन व्हावे हा एकच ध्यास माझा असणार आहे. तेव्हा मायबाप मतदार बंधु भगिनीनो माझी आति, तळमळ लक्षात घेऊन एक उच्चशिक्षित, तरुण उमेदवाराला लोकसभेत खासदार म्हणून जाण्याची संधी द्यावी असे मला प्रामाणिक पणे वाटते आहे.
