पुणे । झुंजार न्यूज
रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने शिर्डी , सोलापूर या दोन लोकसभेच्या जागा मागितल्या असताना सुध्दा महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केलं जात असून रिपाई कार्यकर्त्याला भाजपाच्या नेत्याकडून सन्मानाची वागणुक मिळत नसल्याची खदखद कार्यकर्त्यानी व्यक्त केल्याने महायुतीच्या या वागण्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. शिवाय युतीला आमची गरज नसेल तर सोबत राहायचं की नाही? याबाबतचा निर्णय घेऊ, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीला दिला आहे.
” तसेच युतीत आम्हाला विश्वासात घेतलं जात नसेल तर वेगळा विचार करावा लागेल असे आठवले यांनी ठणकावले “ .
रामदास आठवले हे पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते . यावेळी माजी मंत्री अविनाश महातेकर , रिपाई प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे , कार्याध्यक्ष बाबुराव कदम , गौतम सोनवणे , विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , बाळासाहेब गायकवाड , दिपकराव गायकवाड , राजाभाऊ कापसे , अजय साळवे , भिमा बागुल , सुरेंद्र थोरात , अमित काळे , पप्पू बनसोडे आदीसह केंद्र व राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते .

रामदास आठवले पुढे म्हणाले की , “इंडिया आघाडीचे 12 वाजवायचे आहेत, म्हणून भाजपसोबत आलो आहोत. आम्हांला 2 जागा पाहिजेल. शिर्डी लोकसभेसाठी मी स्वतः उत्सुक असून, सोलापूरची जागाही मिळावी अशी इच्छा आहे. आमच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षासोबत चर्चा केली पण जागावाटपात आमचं नाव येत नाही. कान मागून आलेल्या उमेदवारांचं नावं येतं, मात्र जुनी नावं येत नाहीत. सध्याची महायुती आरपीआयच्या पाठिंब्यामुळे झाली असून, रिपब्लिकन पक्षाकडे लक्ष दिलं जात नसल्याची भावना कार्यकर्त्यांमधून उफाळून आल्याचे दिसले आहे.”

विजयराव वाकचौरे म्हणाले की गेल्या दीड – दोन वर्षापासून रामदास आठवलेच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम घेवून भाजपाच्या अनेक नेत्यासमोर रामदास आठवले यांना उमेदवारी देण्याचे संकेत देत असताना ” आमची मागणी दुर्लक्षित का ? होते स्टार प्रचारकांमध्ये विखे पाटील यांचे नाव येते यांचा अर्थ त्याचा दबदबा आहे मग आठवले यांना उमेदवारी दया या त्यांच्या शब्दाला किंमत नाही का ? हे आम्हाला पडलेले मोठे कोडे पडलेले असून आता मात्र हे निश्चित कार्यकर्त्यानी ठरवले की , दक्षिणेतून मी ( विजय वाकचौरे ) तर शिर्डीतून दिपक गायकवाड , बाळासाहेब गायकवाड , भिमा बागूल पैकी एक जण उमेदवारी करणार .

२०१२ मध्ये गोपीनाथ मुंडेच्या उपस्थितीत रिपाई युतीची सोबत आल्यावर महायुती झाली काना मागून आले अन् तिखट झाले म्हणीनुसार एकनाथ शिंदे , अजित पवार महायती आले त्यांना मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री केले राधाकृष्ण विखे पाटील आले महसूल मंत्री झाले आणि आता मनसे आली त्यांना ही लोकसभेची जागा देत आहे मग आम्ही काय घोडे मारले , देशभर वाढलेल्या पक्षाला केवल ” केंद्रात एक राज्यमंत्रीपद बाकी सब बेकार ” हा सन्मान का ? अशी नाराजी रिपाई कार्यकारिणी बैठकीतून विजयराव वाकचौरे यांनी व्यक्त केली .
चौकट
केंद्रात एक मंत्री पद , राज्यात एक मंत्रीपद , 2 महामंडळ, 40 ते 50 कार्यकर्त्यांना DPDC मध्ये सभासदत्व मिळावे, याकरिता फडणवीसांनी दिलेले आश्वासन विसरले तर दोन लोकसभा एक विधान परिषद आणि पुढील विधानसभेत 10-15 जागा राज्यात मिळाव्यात, अशी मागणी आठवले यांनी केली. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अपमान होत असेल तर वेगळा मार्ग धरावा लागेल आणि महायुतीला आमची गरज नसेल तर सोबत राहायचं की नाही, याबाबतचा निर्णय लवकरचं घेऊ असा इशारा आठवले यांनी दिला जर
“आम्हाला विश्वासात घेतलं नसले व लोकसभेच्या जागा देत नसेल तर कार्यकर्त्याच्या आग्रही भूमिका बघून शिर्डीतून व दक्षिण नगरमधून लढा असे आठवले यांनी ठणकावून सांगितलं.”
