श्रीरामपूर । झुंजार न्यूज

२०२४ निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून याचं पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपा मित्रपक्षांनी केद्रींय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या निवडणुकीकरिता रिपाईला जागा न सोडल्याने पुढील निवडणुकीची रणनिती व शिर्डी व दक्षिण नगर मधून आंबेडकरी चळवळीतील उमेदवारी देण्याकरिता सोमवार दि १ एप्रिल २०२४ रोजी दुपारी तीन वाजता श्रीरामपूर येथील हॉटेल अपुर्वा संजीवनी हॉस्पीटल शेजारी निर्धार चर्चासत्र बैठक रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपाई विभागीय प्रमुख भिमा बागुल यांनी दिली .

गेल्या १२ वर्षापासून रिपाई पक्षाची भाजपाशी मैत्री पुर्ण युतीचे संबंध राहिले असून केद्रींय मंत्री रामदास आठवले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नि:स्वार्थी व प्रामाणिकपणे मैत्रीचे संबंध जपले . मात्र पाहिजेल तसा तालुकास्तरीय , जिल्हास्तरीय सत्तेचा वाटा दिला गेला नाही तरी कार्यकर्त्यानी कुठल्याही प्रकारे आवाज उठविला नाही . शिर्डी लोकसभेकरिता वेळोवेळी जागा देण्याची मागणी स्वतः रामदास आठवलेसह कार्यकर्त्यानी केली मात्र स्थानिक नेत्यासह फडणवीस यांनी दुर्लक्षित केले काना मागून आले आणि तिखट झालेल्यांना महत्व दिल्याचे दिसत आहे . यावेळेस बौध्द समाज्याला रामदास आठवले यांच्या रुपाने संधी मिळेल असे वाटले मात्र राजकिय खेळातून ही शक्यता सुध्दा धुसर झाल्याचे दिसून येत आहे . मात्र बौद्ध समाज्यातील कार्यकर्त्यचं नव्हे संपुर्ण बौद्ध समाज एकवटला आहे . आता माघार नाही ” ना तुला अन् मला , दे दुसऱ्याला ” म्हणीप्रमाणे शिर्डीतून दक्षिणेतून उमेदवार देण्याचा निर्धार झाला त्याकरिता सोमवार दि १ एप्रिल २०र४ रोजी दुपारी ३ वाजता ” निर्धार बैठकीचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , उ. महा अध्यक्ष राजाभाऊ कापसे , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , दलितमित्र पुरस्कार विजेते सुनिल साळवे , जेष्ठ नेते अजय साळवे , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे , युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , जिल्हा विभागीय अध्यक्ष भिमाराज बागुल , रमेश शिरकांडे , अमित काळे , सुभाष त्रिभुवन , अकुश भैलुमे , धनजंय निकाळे , माणिकराव यादव , बापू रणधीर , सागर शिंदे , जेष्ठ नेत्या रमाताई धिवर आदीचे मार्गदर्शन होणार आहे .


