कर्जत । झुंजार न्यूज

 

आमदार.प्रा.राम शिंदे यांनी कर्जत शहराला 2018 साली उजनी वरून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणून कर्जतच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरविल्याचे चित्र दिसले . मात्र महाराष्ट्रात आणि नगरपंचायत कर्जत मध्ये सत्ता बदल झाल्यावर त्याच योजनेचे सत्ताधार्यांनी मातेर केलं . कर्जत मधील महिलांना आज काही जण स्वतःच्या जाहिरातीसाठी पुन्हा त्यांच्या डोक्यावर हंडा देऊन त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी तालुक्याला दाखवत असल्याची टिका भाजपा शहराध्यक्ष आरतीताई थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकाद्रारे केली आहे .

 

2018 सालीच झालेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फिल्टर युक्त पाणी कर्जतला मुबलक प्रमाणात मिळत आहे जलयुक्त शिवार ची योजना महाराष्ट्रात सर्वात जास्त कर्जत जामखेडमध्ये पूर्णत्वास नेली त्यामुळे व कुकडीचे आवर्तन योग्य प्रमाणात पुरेसे मिळाल्या कारणाने दुष्काळात देखील पाण्याचे व्यवस्थापन अतिशय छान होत आहे. प्रशासन देखील अतिशय छान पद्धतीने दुष्काळाचे नियोजन करत आहे प्रशासनाने मोफत टँकर बंद केले नसून फक्त ते जे लेखी परवानगी मागत आहेत ती नाकारली आणि त्यावरील फोटो काढण्यास सांगितले आहे आणि काही जणांना स्वतःचे फोटो लावून टॅंकरने मतदान जवळ आल्यानंतर पाणी वाटपाची जुनी सवय आहे त्यांना साधा आचारसंहितेचा नियम माहित नाही बाकी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत सल्ले देणाऱ्यांना हे माहीत नसावं हे हास्यास्पद आहे परंतु कर्जत जामखेडच्या लोकांना वेड्यात काढण्याचा हा कार्यक्रम राजरोज सुरू आहे .

 

आचारसंहितेत विद्यमान आमदारांना आपला फोटो लावून पाणी वाटता येणार नाही हे माहीत नसावं एवढे ते बालिश नाहीत परंतु माहीत असून देखील पोटकटापणा करण्यात ते धन्यता मानत आहेत . ते असे करणार व त्याची जाहिरात कशी होईल? यासाठी आज झालेला हा हंडा मोर्चा.. नेत्याच्या आदेशाने एकत्र झालेले नगरपंचायत मधील कार्यकर्ते जे रोज शिंदे साहेबांनी आणलेल्या उजनीच्या पाण्याचा वापर करून इतरांना सल्ले देत फिरतात ते त्यांनी बंद करावे….. काल आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला अध्यक्ष या त्यांच्या गावच्या सरपंच ही आहेत त्यांच्या गावाला पाणी टंचाई नाही वाटते कारण कालच्या तारखेपर्यत त्यांच्या गावचा प्रस्ताव पं.स. कर्जत कडे दाखल नव्हता नंतर दाखल केला तर तोही अपूर्ण आणि हया आंदोलनाचे नाटक करत आहेत . . .

 

कर्जत जामखेडचे लोक प्रतिनिधी सैरभैर झाले आहेत म्हणून गुलाम कार्यकर्त्याच्या खाद्यांवर बंदूक ठेवून आंदोलनाचे नाटक केले जात आहे . . प्रसिद्धीशिवाय आणि फोटो शिवाय मोफत टॅकर पाणी पुरवठा करायला कोणाचीच हरकत नाही पण फक्त प्रसिद्धी आणि कंपन्यांचा सीएसआर फंड यावर डोळा ठेऊन दानधर्माचे नाटक करता आणि तो फंड मिळावा म्हणून प्रशासनाकडे लेखी मागता असा दुहेरी खेळ खेळता .. कार्यकर्ते बिचारी आंदोलनात बेंबीच्या देठापासून ओरडतात जेंव्हा प्रांत साहेब वस्तुस्थिती सांगतात त्यावेळी मात्र महिला पदाधिकारी पाणी स्वच्छ मिळत नाही म्हणून आंदोलन केले असे म्हणतात आणि लोकांच्या मध्ये मात्र पाणी टंचाईचा आव आणतात . . . . .

 

आंदोलक महिला पदाधिकार्यानी स्वतःच्या गावाला प्रथम टँकर मंजूर करून लोकांची तहान भागवावी त्यानंतर आंदोलनात भाषणाची पोपटपंची करत इतरांची उठाठेव करावी . असे प्रतिपादन भाजपा महिला कर्जतच्या शहराध्यक्ष (युवती ) सौ आरतीताई थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे . .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed