संगमनेर । झुंजार न्यूज
खासदार भेटत नाही या होणाऱ्या अफवावर लक्ष्य न देता देशाच्या पंतप्रधान पदी आपल्या सर्वागींण विकासाकरिता पुन्हा नरेंद्र मोदीना संधी देण्याकरिता शिर्डीकरांचा खारीचा वाटा असावा म्हणून सदाशिव लोखंडेना प्रतिनिधीत्व करण्याची पुन्हा एकदा संधी दया असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना दादा भुसे यांनी केले .
संगमनेर तालुक्यातील शहरामधील मालपाणी लॉन्स येथे संकल्प महाविजय २०२४ महायुती तालुका स्तरीय मेळाव्या प्रसंगी ना दादा भुसे बोलत होते .

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , उद्योग मंत्री उदय सावंत , उमेदवार सदाशिव लोखंडे , चौधरी , विठ्ठलराव लंघे , कमलाकर कोते , डॉ अशोक इथापे , कपिल पवार , साहेबराव नवले , ॲड पोपट वाणी , सुदाम सांगळे , आंबासाहेब थोरात , जावेद जहागिरदार , श्रीराज डेरे ॲड आदीसह मोठया संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .

यावेळी ना दादा भुसे पुढे म्हणाले की , पदाधिकारी व कार्यकर्त्यानी गांवा गावात जावून प्रत्येक मतदाराला सांगा मोदी यांनी देशाचे नाव जागतिक पातळीवर पोहचविले देशातील प्रत्येक घटकाचा , प्रत्येक माणसाचा सर्वागीण विकास करण्याचे धोरण केले तेव्हा तुम्ही स्वतः च उमेदवार म्हणून लोखंडे करिता मत मागा . तर शिंदे -फडणवीस , पवार यांच्या नेतृत्वाखाली चांगले निर्णय घेण्यात आले व पी एम मोदी योजनेचे केद्र व राज्याचे दोन हजार शेतकऱ्याच्या खात्यात जमा करुन पुण्याचे काम करत आहे . तसेच लेक लाडकीसह अनेक योजना राज्य सरकारने लोकांच्या कल्याणाकरिता राबविल्या .

यावेळी ना .उदय सावंत म्हणाले की , विखेच्या
नेतृत्वाखाली लोखंडे पुन्हा एकदा लाखंडे लोकसभेत जातील असा विश्वास व्यक्त करत शिंदे – फडणवीस – पवार यांच्या नेतृत्वाखाली सक्षम पध्दतीने काम चालू आहे विविध निर्णय जनहितार्थ घेतले जावून प्रत्येक घटकाला न्याय दिला .ही निवडणुक लोखंडे यांची नव्हे तर शिंदे – फडणवीस -पवार-विखे यांच्याअस्तित्वाची लढाई आहे .विरोधकांच्या टिकेवर लक्ष्य देवू नका तर
राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नसून भावनेचा मुद्दा आहे . शिर्डीतून बेरोजगारी दूर करण्यासाठी उद्योग व्यवसायाला चालना देवून रोजगार निर्मिती करायची आहे .तर निवडणुका झाल्यावर 7 स्टार एमआयडीसी करणार अशी शेवटी घोषणा केली .

यावेळी ना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की , दीड वर्षात स्टेजवर गर्दी वाढल्याने ही परिवर्तनाची नांदी असून संकल्प महाविजय समोर ठेवून विश्वनेता नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पतप्रधान बनविण्याचा संकल्प लोकांच्या मनात असल्याने “अब की बार ४०० पार हे होय . या लोकसभेत मतदान विखे , लोखंडे यांना नव्हे तर मोदीला असून नरेंद्र मोदीचे नेतृत्व जगाने मान्य केले . सबका साथ , सबका विकास संकल्पनातून मोदीचे कार्य चालू आहे . वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थीपर्यत जायचे आहे . लोकांना सांगितले पाहिजेल ही योजना मोदीची आहे . केद्राचे सरकार हे छत्रपतीच्या विचाराचे असून आपण त्यांचे मावळे आहोत . लोकापर्यत योजनेची माहिती पोहचत नाही ही नाराजी व्यक्त करत ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले जात आहे . तालुक्यात ठराविक ठेकेदार असून पैसाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत असून त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागेल .

शिंदे – फडणवीस – पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक योजना राबविल्या ५ लाखाचा विमा आरोग्यासह विविध योजना होय विरोधक भाषणे सांगतात की संविधान , लोकशाही धोक्यात आली आहे संविधान , लोकशाही धोक्यात नसून त्यांचे अस्तित्वचं धोक्यात आले आहे . कॉग्रेसच्या बड्या नेत्यालाचं एक ही जागा मिळाली नसल्याने मोठी मोठी खेदाची बाब आहे तर पवारांनी शेतकऱ्यांना पाणी न मिळवून देण्याचे पाप केले .

चौकट – २
जिल्हयाच्या कॉग्रेस नेत्याने विकासाचे मॉडेल मांडले , ते मॉडेल म्हणजे १०० टँकर पाणी पुरवठा मॉडेल होय . तर म्हणे नगरची निवडणुक ही श्रीमंत – गरिबां मध्ये मग उदयाच्या निवडणुकीत संगमनेर मधून गरिब उमेदवार शोधू मग म्हणू श्रीमंत – गरिबांत लढाई ! तर ही निवडणुक व्यक्ती म्हणू नव्हे तर मोदी म्हणून मते दया . ना राधाकृष्ण विखे पाटील
चौकट – २
महायुती घटक पक्ष म्हणून रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षाचा एक ही कार्यकर्ता दिसून न आल्याने रिपाई कार्यकर्ते नाराज दिसून आले .
शिर्डी लोकसभेची रामदास आठवले यांच्याकरिता जागा मागितली मात्र स्थानिक नेत्यासह महायुतीच्या नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने रिपाई कार्यकर्ते नाराज असून एकाही नेत्यांनी अजूनपर्यंत सन्मान पद्धती विचार केला नसून या निवडणुकीत रिपाई तटस्थ रहाणार आहे आशिष शेळके ( रिपाई तालुकाध्यक्ष )
