कोल्हार । झुंजार न्यूज

गेल्या १५ वर्षापासून विकासाला शिर्डी मतदार संघातून मोठी खिळ बसली असून १५ वर्ष नाकर्ते प्रतिनिधी मतदारसंघाला मिळाल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने तरुणांचे भवितव्य अंधारात असल्यानेचं यांचे परिवर्तन करण्यासाठी आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणारचं असे सामाजिक कार्यकर्ते नचिकेत खरात यांनी जाहिर केले .
कोल्हार येथे महाराष्ट्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या समाज भूषण लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त श्री.विश्वनाथ अल्हाट सर व श्री.ज्ञानेश्वर राक्षे यांचा सत्कार करण्यात आला तर आगामी शिर्डी  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेवून चर्चा करण्यात आली याप्रसंगी खरात बोलत होते .
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब बाबुराव जगधने हे होते . तर भाऊसाहेब पवार सर , नितीन भाऊ पोळ , अशोक संसारे ,  शरदराव त्रिभुवन , सुनिल बोरुडे , अनिल कांबळे , भोंडणे ( मेजर ) , राजेंद्र बागुल , राजेंद्र त्रिभुवन ,  भाऊसाहेब आव्हाड , एल पि खरात , बापूसाहेब शेलार , चंदनशिव , आप्पासाहेब शेलार , गणेश नटके , संतोष भडकवाड , विजय सोसे , जनार्धन बोरुडे , बबन बोरुडे , विष्णु आव्हाड , संजय सरोदे , मोहन बोरुडे  , योगेश बोरुडे , जालिंदर थोरात , दत्तू पेटारे , बाबासाहेब बोरुडे , वसंतराव वाकळे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed