एकविराच्या वतीने महिला बचतगट उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी आधुनिक सुविधा
बचत गटाच्या उत्पादनांना शहरात मोठी मागणी- डॉ. जयश्रीताई थोरात
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यात महिला बचत गटाचे मोठे जाळे असून या महिलांनी उत्पादित केलेली विविध खाद्यपदार्थ व घरगुती वस्तूंना शहरांमध्ये मोठी मागणी आहे . बचत गटांमधून उत्पादित मालाच्या विक्री करता स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून दिले जाणार असून चांगल्या प्रकारची विक्री व्हावी याकरता आधुनिक पद्धतीने मार्केटिंग सुविधा निर्माण करून देण्यात आली असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

एकविरा फाउंडेशन च्या वतीने संगमनेर तालुक्यातील महिला बचत गटांच्या करता प्रॉडक्टचे प्रोफेशनल फोटोसेशन आणि डिझाईन सेशन अंतर्गत कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी संगमनेर तालुक्यातील सुमारे 300 ते 400 महिला उपस्थित होत्या.

या सेशनमधून संगमनेर तालुक्यातून आलेल्या विविध महिला बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या सर्व खाद्यपदार्थ व विविध वस्तूंची स्वतंत्र्य प्रोफेशनल फोटोग्राफी करण्यात आली .याचबरोबर त्या बचत गटाच्या समवेत सोशल माध्यमांकरता उत्पादित मालाच्या काही व्हिडिओ तयार केले आहेत. त्या वस्तूंची मार्केटिंग करण्याकरता संबंधित महिला बचत गटांना ते दिले जाणार आहे.

यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाकरता सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून तालुक्यात जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन आहे.
या बचत गटाच्या महिलांनी अनेक घरगुती खाद्यपदार्थ व इतर वस्तू बनवल्या असून त्यांचे मार्केटिंग होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील अत्यंत दर्जेदार पद्धतीने केलेल्या या खाद्यपदार्थांना शहरांमध्ये मोठी मागणी आहे .

महिला बचत गट ते मेट्रो सिटी अशी या वस्तूंच्या विक्री करता थेट सुविधा करण्यात येणार आहे.
तसेच हाय टेक्नॉलॉजी वापरून या सर्व बचत गटांच्या खाद्य व इतर वस्तूंच्या विक्री करता प्रोफेशनल फोटोसेशन व प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग करून या सर्व महिला भगिनींना त्यांच्या या प्रोडक्टच्या मार्केटिंग करता दिले जाणार आहे.

महिलांच्या सुविधा करता हा हायटेक प्रोजेक्ट ग्रामीण भागात राज्यात प्रथमच राबवला जात असून या नवीन उपक्रमामुळे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मोठी मागणी मिळणार आहे.

याचा लाभ या गरीब महिलांना होणार असल्याने सर्व महिला भगिनींनी कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या या राबवीवलेल्या या संकल्पनेचे मोठे कौतुक केले आहे
