पानोडी । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरासह पानोडी येथे मुस्लिम बांधवांसाठी रमजान ईद निमित्ताने मजिद मध्ये आदल्या दिवशी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून फराळाचे वाटप करण्यात येवून रमजान ईद साजरी करण्यात आली .

यावेळी माजी उपसंरपच अशोक तळेकर , राजेंद्र जाधव , माजी पोलिस आधिकारी भाऊसाहेब चव्हाण , रावसाहेब घुगे रिपाई तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम , पत्रकार राजेश गायकवाड , नय्युम सय्यद , अजितभाई अशरफी , अलिम सय्यद , बाबुलाल सय्यद आदीसह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्पित होते .
यंदा भारतामध्ये रमजान ईद 11 एप्रिल दिवशी आहे. ईद ही चंद्र दर्शनावर अवलंबून असते. इस्लामिक कॅलेंडर नुसार 10 व्या शव्वाल महिन्याचा पहिला चंद्र दिसला की ईद साजरी केली जाते. 
मग या रमजान ईदच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना देऊन या सणाचा देखील गोडवा वाढवण्यासाठी WhatsApp, Instagram, Facebook, Twitter वर शुभेच्छापत्रं, ग्रिटिंग्स, Wishes, Messages, Quotes, HD Images शेअर करत या ईदचा आनंद द्विगुणित करू शकाल.

ईद च्या दिवशी मशिदींमध्ये विशेष नमाज अदा केली जाते. घरात गोडा-धोडाचे देखील जेवण बनवले जाते. ‘ईद मुबारक’ म्हणत गळाभेट घेतली जाते. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव अल्लाह चे आभार व्यक्त करतात. घरात लहान मुलांना ‘ईदी’ च्या स्वरूपात भेटवस्तू किंवा पैसे दिले जातात”

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *