[महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या कामाचा बट्ट्याबोळ]
राहाता । झुंजार न्यूज
राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत हद्दीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध ठिकाणी रस्त्यांवर, गल्लीबोळांमध्ये जेसीबी ने खड्डे खोदून पाईप बसवण्याचे काम सुरू असले तरी ते काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी हे खड्डे अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकडे संबंधित विभाग व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असून त्याचा त्रास मात्र नागरिकांना सोसावा लागत आहे. या कामाचे नियोजन नसल्याने व संथ गतीने हे काम सुरू असल्यामुळे येथील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लोहगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये सध्या महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना राबवली जात असून या योजने अंतर्गत गावामध्ये ठिकठिकाणी जेसीबीने खड्डे खोदून नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे . गावात अनेक ठिकाणी छोटे रस्ते, गल्ली बोळा आहेत.तेथे खोदाई करून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात खड्डे खोदून ठेवले मात्र पुढील पाईप लाईन टाकून ते बुजवण्याचे काम लवकर होत नसल्यामुळे गावामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांना येण्या-जाण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे खड्डे खोदून ठेवले मात्र हे काम ताबडतोब होणे गरजेचे असतानाही त्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे.याच कारणाने नागरिकांना येण्या जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.एखाद्या रुग्णांसाठी तो मृत्यूचा सापळा ठरत तसेच गर्ववती महिलांना या रस्त्याने चालणे शक्यच नाही. हे काम करत असताना व नवीन पाईपलाईन साठी खड्डे खोदत असताना जुनी पाईपलाईन अचानक फुटल्यामुळे ऐन उन्हाळ्यात काही भागात पाणीपुरवठाही बंद झाला आहे. अनेक ठिकाणी हे खड्डे खोदले आहे तेही आडमाप असल्याने कामाचे तीन तेरा होऊ एवढीच माफक अपेक्षा जनता व्यक्त करत आहे हे खड्डे जर व्यवस्थित घेण्यात आले नाहीत.तर या खड्ड्यांमध्ये नवीन पाईपलाईन टाकून ते त्वरित जेसीबीच्या साह्याने मातीने बुजवणे गरजेचे होते.मात्र खड्डे व्यवस्थित खोदले नसल्याने पुढील बुजवण्याचे काम संथ गतीने सुरू आहे.त्यामुळे त्या त्या भागातील रहिवाशांना याचा खूप त्रास होत आहे.गेल्या चार-पाच दिवसापासून पिण्याचे पाणी नाही.येण्या जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी घरातून मुख्य महामार्गवर उचलून आणावे लागत आहे.लहान मुले या खड्ड्यात पडून किरकोळ जखमी होत आहेत.अशी परिस्थिती असताना हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी या महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या कामाकडे किंवा ठेकेदाराकडे कोणाचे लक्ष नाही. ग्रामपंचायतचे पदाधिकारी देखील त्याकडे कानाडोळा करीत आहेत.संबंधित प्रत्येक वार्डामध्ये हे काम सुरू आहे व चार-पाच दिवसापासून अर्धवट स्थितीत आहे.काही ठिकाणी संथ गतीने सुरू आहे.मात्र तेथील ग्रामपंचायत सदस्य ही त्याकडे लक्ष देत नाहीत.त्यामुळे रहिवाशांमध्ये मोठी नाराजी आहे.

नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना ही चांगली गोष्ट आहे.मात्र हे काम त्वरित होणे गरजेचे आहे कारण गावांमध्ये छोटे छोटे रस्ते ,छोट्या गल्लीबोळा असताना त्या खोदून ठेवल्या. त्या चार-पाच दिवसापासून तशाच उघड्या आहेत. बुजवल्या गेल्या नाहीत.हे काम अगदी संथ गतीने सुरू आहे ते कोणत्या कारणाने हाच यक्षप्रश्न निर्माण झाला आहे मुळातच एका भागातील हे काम ठेकेदाराने खड्डे खोदून प्रथम ते पूर्ण केल्यानंतर दुसरीकडे खड्डे खोदून काम करणे गरजेचे होते.मात्र सर्वच ठिकाणी अर्धवट खड्डे खोदून ठेवले व पुढील काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.त्यामुळे गावाच्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष द्यावे नागरिकांना या खोदून ठेवलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या खड्ड्यांमुळे सध्या मोठा त्रास होत आहे .

जुनी पाईपलाईन फुटल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी ऐन उन्हाळ्यात मिळत नाही.त्यामुळे या नवीन पाईपलाईनचे काम त्वरित पूर्ण करावे.यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला किंवा कर्मचाऱ्यांना तशी ताकीद द्यावी. अशी मागणी ही येथील ग्रामस्थांनी, विशेषता महिला वर्गामधून होत आहे.
