कर्जत । झुंजार न्यूज
क्रांतीसुर्य महात्मा फुले,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम कर्जत (सिद्धार्थ नगर) येथे संपन्न झाला,
यावेळी कर्जत नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. उषाताई अक्षय राऊत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर उद्घाटक माजी नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई नंदकुमार भैलुमे यांच्या वतीने मनाली अजय भैलुमे या उपस्थित होत्या. फुले शाहू आंबेडकर विचारांची प्रेरणा घेऊन त्यांचे कार्य जोमाने पुढे घेऊन जाऊ तरच सामाजिक क्रांती होईल असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ उषाताई अक्षय राऊत यांनी यावेळी व्यक्त करत सर्वांना महामानवांच्या जयंती उत्सव निमित्त शुभेच्छा दिल्या.

तसेच माजी नगरसेवक पुजाताई म्हेत्रे यांनी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाला ज्यांनी आवर्जून उपस्थिती राहुन भर दिला असे कार्यक्रमातील भाऊजी श्रीनिवास गजरमल, नटरंग फिल्म प्रोडक्शन अभिनेत्री जया इंगोले ,अनिकेत सरोदे, सागर गवळी तसेच अनिता चिंचकर, वैशाली संजय भैलुमे,शोभाताई अनिल भैलुमे, पल्लवी निशिकांत भैलुमे, लताताई प्रतापराव भैलुमे, कोमल रोहन कदम, शांताबाई मुकींदा समुद्र,निशा रमेश शेलार, कविता सचिन गायकवाड, कांता चांगदेव सरोदे यांच्या सह अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रातील भीमसैनिक उपासक उपासिका मित्रपरिवार मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

अनेक महिला या पैठणी खेळात सहभागी होऊन याठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि या खेळ पैठणीचा कार्यक्रम विजेत्या वीस महीला या बक्षिसांच्या मानकरी ठरल्या आहेत . अतिशय सुंदर आणि आकर्षक असा स्तुत्य उपक्रम भारतीय बौद्ध महासभा कर्जत शहर महिला शाखा वतीने करण्यात आला. महिलांमधून अतिशय आनंदी उत्साह दिसून येत होता. हा खेळ पैठणीचा कार्यक्रम अतिशय हास्य आनंदी वातावरणात भाऊजी श्रीनिवास गजरमल यांनी त्यांच्या कौशल्याने महीलांमधे उत्कृष्ट असा खेळ सतत तीन तास रंगलेल्या स्वरूपात दिसुन येत होता.

मुक्ता सोमनाथ भैलुमे, अश्विनी गोदड समुद्र सारिका धनंजय भैलुमे प्रतिभा विकास समुद्र, प्रियंका नवनाथ भैलुमे यांच्या सह अनेक महीला तसेच सोमनाथ भैलुमे धनंजय भैलुमे गोदड समुद्र, विकास समुद्र नवनाथ भैलुमे यांच्या सह अनेक भीमसैनिक कार्यकर्ते यांनी मोठ्या परिश्रमाने हा कार्यक्रम घडवून आणला.

यावेळी रोहन कदम, रमेश शेलार, सचिन गायकवाड, प्रकाश शिंदे, शिवानंद पोटरे यांच्या सह अनेक विविध क्षेत्रातील पदाधिकारी भीमसैनिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गोदड समुद्र यांनी सुत्रसंचलन केले तर सोमनाथ भैलुमे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत आणि आभार व्यक्त करत उपस्थित सर्वांना महामानवांच्या जयंती निमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.
