{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

हिंदुत्वासाठी आणि वारकरी संप्रदायासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या महंताबद्दल अलीकडच्या काळात केले गेलेले शब्दप्रयोग अत्यंत निषेधार्ह आहेत. अहिल्यानगरचे भूमिपुत्र आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज, महंत भास्करगिरी महाराज आणि महंत रामगिरी महाराज यांच्या पाठीशी संपूर्ण हिंदू समाज खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 

हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाच्या अस्मितेवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन महंत भास्करगिरी महाराज यांची आणि त्यानंतर सरलाबेट येथे जाऊन महंत रामगिरी महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महंतांशी चर्चा करून सध्याच्या घडामोडींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.


वारकरी संप्रदायात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही

भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, “मागील काही दिवसांपासून राज्यात वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्मासाठी कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींबद्दल अवमानकारक लिखाण आणि शब्दप्रयोग केले जात आहेत. वारकरी संप्रदायात फूट पाडण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला कट आहे. मात्र, अनेक वर्षांची परंपरा असलेला हा संप्रदाय कोणाच्याही अशा वागण्याने विचलित होणार नाही. उलट, संत परंपरेचा वारसा घेऊन वारकरी संप्रदाय अधिक एकसंघपणे आणि जोमाने काम करेल.”

विरोधकांवर टीका करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, देव, देश आणि धर्मासाठी आयुष्य वेचणाऱ्या महंतांबद्दल आपण काय बोलतो, याचे भानही काहींना राहिलेले नाही. प्रत्येक गोष्टीकडे केवळ ‘व्होट बँक’ म्हणून पाहण्याची प्रवृत्ती घातक आहे. लव्ह जिहादपासून ते कॉर्पोरेट जिहादपर्यंतच्या गंभीर घटनांवर मौन बाळगणारे लोक, हिंदुत्वासाठी परखड भूमिका मांडणाऱ्या महंतांचा अवमान करतात. सामाजिक तेढ निर्माण करण्याचे हे प्रयत्न अत्यंत निंदनीय आहेत.

 

वारकरी परंपरेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी स्पष्ट केले की, वारकरी संप्रदायाला धर्माचे मोठे अधिष्ठान आहे आणि त्यामुळेच समाज आजही धर्माच्या धाग्याने बांधलेला आहे. हा संप्रदाय कधीही निधर्मी होऊ शकत नाही. कोणाच्याही वैयक्तिक मतामुळे हे धार्मिक अधिष्ठान कमी होणार नाही.

 

Oplus_131072

या भेटीदरम्यान आमदार विठ्ठलराव लंघे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि वारकरी संप्रदायातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed