{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

डॉ.कुमार सप्तर्षी हे गांधीवादी विचारांचे पाईक – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

.ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी तत्त्वांचे अखंड पुरस्कर्ते आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर झटणारे डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने गांधीवादी विचारांचा निष्ठावंत दीपस्तंभ हरपले असल्याची भावना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे तर गांधीवादी विचारांचा पाईक हरपला असल्याची भावना माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की , ‘युक्रांद’च्या माध्यमातून त्यांनी असंख्य तरुणांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन, सामाजिक भान आणि अन्याय – अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याची प्रेरणा जागवली. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला नवी दिशा दिली. त्यांच्या जाण्याने समाजमनाला विचारांची दिशा देणारा एक संवेदनशील, अभ्यासू आणि निर्भीड आवाज कायमचा हरपला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना तसेच युक्रांद परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो ही प्रार्थना.

लोकशाही सामाजिक न्याय आणि जनजागृती साठी आपले आयुष्य समर्पित करणारे अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र जेष्ठ विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी हे गांधीवादी विचारांचे पाईक होते त्यांच्या निधनाने आपले सामाजिक कार्यातील जेष्ठ मार्गदर्शक हरपले असल्याची भावना जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.

डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना अभिवादन करताना माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा समतेचा विचार पुढे नेण्यासाठी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर काम केले. युवक क्रांती दलाचे ते संस्थापक अध्यक्ष होते महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. माझ्या वैयक्तिक आयुष्यात त्यांचे स्थान अत्यंत मोलाचे आहे त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले.

कुमार सप्तर्षी यांचे शालेय शिक्षण अहिल्यानगर मध्ये झाले. सत्याग्रही विचारधारा या त्यांच्या मासिकाने सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांची दिलीप 35 वर्ष वैचारिक बांधणी केली. पुणे येथील गांधी भवनाची वास्तू जागा वाचवण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले युवक क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर हजारो विद्यार्थी घडवले ते परिवर्तनवादी समाजवादी चळवळीचा आधारवड होते समाजातील विषमता, अन्याय आणि अंधश्रद्धे विरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले.


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तत्त्वांवर लोकनेते बाळासाहेब थोरात व आपण कायम पुरोगामी विचार आणि वारकरी संप्रदायाचा समतेचा आणि मानवतेचा विचार जपला. हा विचार माझ्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा असून डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे मोलाचे स्थान होते. ज्या विचारांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले तो विचार पुढे घेऊन जाणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार असल्याचे जय हिंद लोक चळवळीचे संस्थापक पुरोगामी विचारांचे पाईक माजी आमदार डॉ.सुधीर तांबे

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *