मुंबई । झुंजार न्यूज

नगर दक्षिण मधील भाजपा मित्र पक्षाचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज २२ एप्रिल २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने युतीमधील सहयोगी असणाऱ्या रिपाई पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांना निमत्रंण देण्याकरिता आलो असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली 
oplus_2
मुंबई येथील बांद्रा येथे असणाऱ्या रामदास आठवले यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या भेटीनंतर ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकाराशी संवाद साधला .
oplus_2
संध्या २०२४ लोकसभेचे उन्हाच्या कडाक्याप्रमाणे निवडणुकीचे ही वातावरण ताप असताना शिर्डीमधून रामदास आठवले यांना निवडणूक लढविण्याकरिता जागा मिळाली नसल्याने जिल्हयामधील कार्यकर्त्यामध्ये नाराजी निर्माण झाली मात्र गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण नगर व शिर्डीमध्ये भाजपा मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार अथवा कुठल्याही कार्यक्रमातून रिपाई कार्यकर्त्याची अनुपस्थिती ही खटकणारी बाब असल्यानेचं राधाकृष्ण विखे पाटील व रामदास आठवले यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले .
रामदास आठवले यांच्या समोर उत्तर व दक्षिण पदाधिकाऱ्यांना भविष्यात न्याय व सन्मान मिळेल अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली तर शुक्रवारी उतरेतील व शनिवारी २० एप्रिल रोजी दक्षिणेतील कार्यकर्त्याची विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे .
यावेळी विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , बाळासाहेब गायकवाड , राजाभाऊ कापसे , भाजपा श्रीरामपूर तालुका ध्य क्ष भिमाभाऊ बागुल , सुनिल साळवे  , पप्पू बनसोडे , संजय भैलुमें , अमित काळे आदीसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed