संगमनेर । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची व कायम चर्चेत असणाऱ्या ग्रामपंचायत च्या तीन सदस्य गणेश पानसरे , वनिता भोसले व संजना पवार यांनी एकाच वेळेस राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे .

 

या सदस्यांनी राजीनामा दिल्याचे कारण ही तसेच आहे ग्रामपंचायत ला सध्या प्रशासक आहे कर्मचारी मनमानी पद्धतीन कामे करतात सदस्य व नागरिकांना अरेरावी करतात कामे वेळेवर करत नाही ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिक वणवण करतात कोकणगांव शिवापुर ग्रामपंचायत ला मुबलक पाणी उपलब्ध आहे परंतु पाणी पुरवठा करणारे कर्मचारी योग्य पध्दतीने नियोजन करत नाही निवळ पाणी पुरवठा करण्यासाठीच तीन कर्मचारी असुन देखील नागरिकांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी मिळत नाही कोकणगांव शिवापुर ग्रामपंचायत आज वसुल बघीतला तर खुप मोठा आहे परंतु वसुली केली जात नाही त्यामुळे ग्रामविकास ला बाधा निर्माण झाली आहे .

 

 

कोकणगांव शिवापुर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे मोठ्या प्रमाणात कमीशन एंजड आहे प्रत्येक विकास कामात कमीशन घेतले जाते चांगली कामे चालु असली की हे कमीशन एंजड कामात खोडा घालतात ठेकेदारास धमकावतात कमीशन ठरले की शांत बसतात अशा कारणाना वैतागून या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी एकाच वेळेस राजीनामा दिला आहे

 

 

आता यावर नागरीक काय निर्णय घेतात हे महत्वाच ठरणार आहे ग्रामपंचायत कर्मचारी याच्यावर कारवाई होणार का ? नागरीक सदस्याच्या बाजुने उभे राहणार का दिलेले राजीनामे मंजुर होऊन निवडणूक होणार की राजीनामे मागे घेतली जाणार याकडे गावचे लक्ष लागले आहे .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed