शिर्डी । झुंजार न्यूज

महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दररोज काही ना काही धक्के महाविकास आघाडी आणि महायुतीला बसत आहे आणि त्यातच बहुजन वंचित आघाडीने निवडणुकीचे सर्वांचे गणितच बदलून टाकले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात पहिल्याचं एका महिला दमदार एंट्रीने सर्वांनाच धक्का दिला आहे. सुशिक्षित व पदवीधर अशा तरुण महिला उमेदवारास ‘वंचित’ने तिकीट देऊन लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उमेदवारी देऊन शिर्डीत इतिहास रचला गेला आहे .
शिवसेना उबाठा गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सलग दोनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार सदाशिव लोखंडे तिसऱ्यांदा शिवसेना शिंदे गटाकडून आपले नशीब अजमावत आहेत. या दोन्ही उमेदवारांना मतदारसंघात कार्यकत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागताना दिसत आहे. तर अनेक प्रसंगी थेट सभेत वादविवाद बघावयास मिळत आहे. त्यातून बहुजन वंचित आघाडीने कॉग्रेसवर नाराज असलेल्या उत्कर्षा रूपवते यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारीही दिली. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक तिरंगी , चौरंगी होवू शकते , अशी जोरदार चर्चा सुरू आहे. 
हा राखीव मतदारसंघ असल्याने रिपाईचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे इच्छुक होते, परंतु त्यांची उमेदवारी महायुतीने नाकारल्याने तेही नाराज होते विशेषता विखे पाटील यांच्यावर नाराज झाले तर शिर्डी व दक्षिण मतदारसंघातील अनेक दलित संघटनाही नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलूनही दाखविली होती. मात्र अचानक राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत जावून केद्रीय मंत्री रामदास आठवले भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला तर रिपाईच्या कार्यकर्त्याच्या योग्य ते सन्मान केला जाईल अशी ग्वाही देत उत्तर व दक्षिण मध्ये रिपाई कार्यकर्त्याची स्वतंत्रपणे बैठक बोलविला मात्र यात विखे पाटील हे कार्यकर्त्याची नाराजी दूर करण्यात कितपत यशस्वी होतील हे काळचं ठरवेल .
अशातच मुस्लिम, ओबीसी, दलित मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा कौल महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना मतदारसंघातील घुसमटलेल्या वातावरणात ‘दोघांच्या भांडण , तिसऱ्याचा लाभ ॥ या वा युक्तीवादाप्रमाणे उत्कर्षा रूपवते यांना नक्कीच फायदा होईल, अशी प्रतिक्रिया बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्याकडून बोलताना दिसली . एकंदरीतच निवडणुकीच्या या रणसंग्राममध्ये महिला बाजी मारणार का? शिडी लोकसभा मतदारसंघात इतिहासामध्ये पहिली महिला खासदार म्हणून उत्कर्षा रूपवते यांना संधी मिळणार का ? हे आता मतदानानंतरच स्पष्ट होईल.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed