मुंबई । झुंजार न्यूज
गेल्या दोन वर्षांपासून 2024 लोकसभा डोळ्यासमोर ठेवून रामदास आठवले यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला कार्यकर्त्यांना ताकद व बळ दिले मात्र निवडणुका लागताचं भाजपासह मित्र पक्षांनी जागा वाटात रिपाई पक्षाला गृहीत धरलेचं नाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर वेळोवेळी आठवले यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिर्डीच्या जागेची मागणी करुन ही “काना मागून आले आणि तिखट झाले ” म्हणीनुसार शिंदे गटाला जागा सोडण्यात आल्याने आठवले यांच्यासह कार्यकर्त्यामध्ये नाराजी निर्माण झाली त्यात विखे पाटील यांनीचं रामदास आठवले यांना तिकिट मिळू नये म्हणून पत्र दिल्याचे वार्ता पसरल्याने नाराजी आणखीन भर पडल्याने ” युतीच्या कोणत्याही उमेदवार काम न करण्याची भूमिका नगर जिल्हयातील कार्यकर्त्यांनी घेतल्याने युतीच्या प्रचार कार्यक्रमात रिपाई कार्यकर्त्याची उणीव भासू लागल्याने हा मेळ न बसणारा खेळ योग्य नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लक्ष्यात आले व रिपाई कार्यकर्त्यानी मुंबईतून विखे जोपर्यंत आठवले यांची भेट घेत नाही तोपर्यंत आपण युतीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची भीम गर्जना केल्याने अखेर विखे पाटील यांनी संविधान वर जावून आठवले यांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला ‘
तास भराच्या झालेल्या चर्चातून “शिर्डीची जागा देवू नये ” या खळबळ जनक पत्राची स्वतः विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्रारे संवाद साधून रामदास आठवले यांच्याशी बोलणे करुन पत्राबाबत असणारे गैरसमज दूर करण्यात आल्याने विखे – आठवले यांचे दिलजमाई होवून जिल्हयातील कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात येईल अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिल्याने महीनाभराच्या नाटयमय नाराजी अखेर पुर्णविराम मिळाला .
अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील राजकारणासह सहकार क्षेत्रातील बाल्लेकिला समजला जातो सहकार चळवळीसह , अनेक चळवळी निर्माण झाल्या तर राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे नेते मंडळी येथे आहेत विखे – थोरात – काळे – कोल्हे – गडाख – पिचड पाचपूते – कर्डीले – जगताप – नागवडे – घुले – राजळे आदीनी आप – आपले बाल्लेकिल्ले शाबूत ठेवले . मात्र संध्याच्या राजकिय चक्रव्याहात राजकारणाचा फार मोठ्या गच्या झाला आहे प्रत्येकांची महत्वकांक्षा जागा झाल्याने आपण ही राजकारणाचे प्यादे व्हावे अशी इच्छा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे . शिर्डी लोकसभा पुर्वी कोपरगांव लोकसभा होता बहुतांश वेळा या मतदार संघावर बाळासाहेब विखे पाटील यांच्या रुपाने कॉग्रेस पक्षांचे वर्चस्व राहिले . मात्र 2009 ला कोपरगांवचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ निर्माण होवून मागसवर्गियांकरिता राखीव झाला . हा मतदारसंघ राखीव बरोबर पक्षातंर हि झाला . 2009 ला रामदास आठवले यांचा पराभव झाल्याने संपूर्ण जिल्हयातील बौध्द समाज्यात नाराजी निर्माण झाली . मात्र आठवले यांच्यासह जिल्हयात ही राजकारणाची नवी दिशा मिळाली . थोरात तांबे वगळता कॉग्रेसमय जिल्हया भगवामय झाला . मात्र तरी ही राजकारणाची विखे – थोरात हे दिशा ठरवू लागले .
दलित पँथर पासून रामदास आठवले यांचा या जिल्हयाशी जिव्हाळा राहिल्यानेचं पुन्हा एकदा 2024 लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा निर्माण झाली . भगवामय झालेला मतदारसंघा विजय सोपा होता मात्र जागा वाटपात शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिंदे गटाला मिळाल्याने आठवले यांच्यासह कार्यकर्ते नाराज झाले त्यांचा सर्व रोष हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गेल्याने रिपाई कार्यकर्त्यांनी जिल्हयात अनेक ठिकाणी बैठका घेवून विखे व युतीला काम न करण्याची भूमिका घेतल्याने युतीमध्ये अडचणीनी येवू लागल्या वृत्तपत्रातून , मिडीयातून बातम्या झळकू लागल्या रामदास आठवले युतीतून बाहेर पडणार , वेगळा विचार करणार त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने रामदास आठवले यांची भेट घेवून नाराजी दूर केली त्यामुळे आठवले यांनी सुध्दा नमाईची भूमिका घेतली . मात्र मुंबई येथे झालेल्या बैठकीत नगर जिल्हयातील कार्यकर्त्यांनी मांडलेल्या युतीकडून आमचा सन्मान होत नाही , जिल्हयातील विविध होणाऱ्या सत्तेत सहभागी करत नाही , संध्याच्या निवडणुकीतील उमेदवार विचारत नाही आदी भावना लक्ष्यात घेवून राधाकृष्ण विखे पाटील जोपर्यंत मुंबई येथे येवून आठवले यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक घेत नाही तोपर्यंत कुठलाही कार्यकर्ता प्रचारात सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतल्याने मनाचा मोठेपणा दाखवत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईतील बांद्रा येथील रिपाई कार्यालयात येवून रामदास आठवले व कार्यकर्त्यांच्या मनातील समज – गैरसमज दूर करत सर्व आश्वासनाची पूर्तता करण्याची ग्वाही दिली .
तर उत्तर – दक्षिण अशा दोन बैठका घेवून कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले जाईल त्याच धरर्तीवर उत्तर विभागाची लोणी येथील जनसेवा कार्यालयात मंत्री दादा भूसे , भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येवून कार्यकर्त्याच्या भावना समजावून घेतल्या व रविवार दक्षिण कार्यकर्त्यांची बैठक घेवून कार्यकर्त्यांचे समाधान केले जाईल असे सागितले गेले
Post Views: 741
