शिर्डी । झुंजार न्यूज

 

 

दोन वेळा मोदी लाटेवर स्वार होऊन लोकसभेत गेलेले महायुतीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या समोर या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे उभे ठाकते आहेत. सातत्याने राखलेला मोठा जनसंपर्क हा महत्त्वाचा मुद्दा हाती घेतलेले वाकचौरे हे सर्वत्र चर्चेत देखील आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रूपवतेच्या रुपाने प्रथमचं एक महिला ऐनवेळी मैदानात उतरत्याने ही लढत तिरंगी व रंगतदार होऊ शकते. मात्र अपक्षांसह विविध संघटनेच्या उमेदवारीमुळे मोठ्या प्रमाणात मते विभागली जाणार असल्याचे चित्र दिसत असले तरी यांचा फायदा कोणाला होणार ?

रूपवते यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलली. रूपवते यांच्या उमेदवारीचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना बसू शकतो महाविकास आघाडीच्या आजच्या पहिल्याच प्रचारसभेत शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या साक्षीने वाकचौरे यांनी आपल्या भाषणात रूपवते यांच्या उमेदवारीची दखल त्यामुळेच घेतली लोखंडे आणि वाकचौरे यांच्यातील सामन्यात वाकचौरे यांच्याकडे सातत्याने ठेवलेला मोठा जनसंपर्क ही जमेची बाजू आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , नेवासाचे आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख , श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांचे मोठे पाठबळ त्यांना आहे . तर

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ लाभलेल्या लोखंडेंना कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अकोल्याचे आमदार किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार भानुदास मुकूटे प्रकाश विते यांचे पाठबळ आहे. मात्र. या निवडणुकीत मोदी लाट प्रत्यक्ष दिसत नसल्याने जनसंपर्काचा मुद्दा लोखंडेंच्या विरोधकांनी जाणीवपूर्वक चर्चेत आणला आहे .

मागील दोन निवडणुकीत मतदार लोकसभेला आणि विधानसभेता वेगवेगळा पध्दतीचा कौल देत असल्याचे निष्पन्न झाते. या निवडणुकीत असेच झाले,
तर दोन्ही बाजूंच्या या मातब्बर नेत्यांचे पाठबळ या निवडणुकीवर देखील फारसा परिणाम करू शकणार नाही या मतदारसंघात दलित मतांची संख्या दोन लाखांपर्यंत आहे. मतदारसंघ राखीव असताना गेल्या दोन निवडणुकांपासून नवबौध्दांना महत्वाचे राजकीय पक्ष उमेदवारी देत नाहीत. पहिल्या निवडणुकीत विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पांचा पराभव झाला. यामुळे या मतदारांत नाराजीची भावना असल्याने 2024 मध्ये पुन्हा उमेदवारी करुन वचपा काढण्यासाठी प्रयत्नात असलेल्या रामदास आठवले यांना उमेदवारीचं मिळाली नाही त्यामुळे बौध्द समाज्यात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली या नाराजीचा फटाका बसू नये म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सावध भूमिका घेत थेट रामदास आठवले यांचे मुंबईतील घर गाठून त्यांच्या मनातील असलेला गैरसमज दूर केल्याने रिपाई कार्यकर्ते पुन्हा सक्रियेच्या भूमिकेत असल्याने पुन्हा या निवडणुकीत लोखंडेचे पारडे जड होण्याचे चिन्हे दिसू लागले आहे .

यापूर्वी युवक काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या असलेल्या रूपवते यांनी निवडणुकीचे राजकारण केलेले नाही. मात्र, एकाचवेळी कै दादासाहेब रुपवते व कै मधुकर चौधरी या दोन दिग्गज काँग्रेस नेत्यांचा वारसा त्यांच्याकडे आाहे. त्या उच्चशिक्षित व तरुण असून विशेषता म्हणजे आता पर्यंतच्या लोकसभेच्या राजकारणात त्या उमेदवारी करणाऱ्या पहिल्या महिला आहे . २०१४ ला त्यांचे वडील हे निष्ठावंत असताना सुध्दा कॉग्रेस मध्ये आयात झालेल्या वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली तर २०२४ सुध्दा मुलगी उत्कर्षा हुलकवणी दिल्याने त्या नाराज झाल्या . त्यामुळेचं त्या वंचितच्या रुपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने शिर्डी मतदार संघात आता निवडणुकीची रंगत दिसणार आहे . मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेद‌वार संजय सुखदान यांनी ६८ हजार मते मिळवली होती .

राजकीय नेत्यांचा प्रभाव

हा मतदारसंघ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे होमग्राउंड, त्यांच्याकडे लोखंडे यांची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविली आहे. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे व अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांची साथ असून रिपाई पक्षाची ही मोठी ताकद त्यांच्या मागे उभी रहाणार असल्याचे विजय वाकचौरे यांनी सांगितले आहे .

महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख आणि श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांचे मोठे पाठबळ असून वाकचौरे हे अकोले तालुक्यातील भूमीपुत्र असून बहुतांश वर्ष ते शिर्डी व परिसरात राहिल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे . तर वाकचौरे हे २००९ ला खासदार झाले तेव्हा पासून विकास निधी लोकांना कळू लागला त्यांनी प्रत्येक गांवात विकास निधी वापरल्याने ते लोकांच्या मनात बसले आहे .

शिर्डी लोकसभा राखीव असल्याने महायुतीकडून सदाशिव लोखंडे , आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे , वंचितकडून उत्कर्षा रुपवते , ओ बी सी बहुजन आघाडीकडून अशोक अल्हाट  तर मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख म्हणून काम बघितलेले नचिकेत खरात हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन आपले नशिब अजमावणार असल्याने यात फायदा कोणाचा , तोटा कोणाचा हा निर्णय आता मतदारचं घेणार . मात्र लोखंडे यांच्या आज ही समाज्यात मोठया प्रमाणात नाराजी असल्याचे दिसत असल्याने ही निवडणुक कोणत्या वळणावर जाईल या निवडणुकीतून महिला , तरुण व सुशिक्षित चेहरे दिसणार असल्याने मतदार नविन चेहऱ्यांना स्विकारतील की , जुन्या चेहऱ्यांनाचं संधी देतील हे लवकरचं समजेल .
किस्सा
 २०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेकडून पून्हा उमेदवारी मिळणार असताना ही वाकचौरे यांनी दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी ऑफर दिल्याने काँग्रेसकडून उमेदवारी केली. त्यात ते पराभूत झाले आणि शिवसेनेचे खासदार म्हणून सदाशिव लोखंडे मोदी लाटेवर स्वार होऊन १३ दिवसात लोकसभेत गेले त्यामुळेचं त्यांना महत्व कळाले नाही . आज ही गावा गावात खासदार कोण आहे बोलले जात आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed