अहमदनगर । झुंजार न्यूज
2024 लोकसभा निवडणुका उन्हाच्या कडाक्याप्रमाणे निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना महायुतीचा सहयोगी असणाऱ्या रिपाई पक्षाला अजून ही गृहित धरले नसल्याने ही फसवेगिरीचे धोरण दिसत असल्याने निर्णायक भूमिका घेण्याकरिता रिपाई कार्यकर्त्यांनी बुधवारी नगर येथे बैठकी जुन्या – नव्या कार्यकर्त्यांची बैठक बोलविली या बैठकीतून रिपाई कार्यकर्ता आक्रमक पावित्रा उचलण्याच्या तयारी दिसणार आहे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभेची मागणी करुन सुध्दा भाजपाच्या कोअर कमिटीमधून रामदास आठवले यांचे नाव घेतले नसल्यानेचं शिर्डीची जागा न मिळाल्याने आठवलेबरोबर नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरली . त्यात शिर्डीतून शिंदे गट व नगरमधून भाजपाचे उमेदवार जाहिर होवून प्रचारात आघाडी घेतली तरी ही रिपाई कार्यकर्त्याना गृहीत धरले नसल्यामुळेचं कार्यकर्त्यानी आक्रमक भूमिका घेवून जो पर्यंत नगर व शिर्डीचे उमेदवार व जिल्हयाचे पालकमंत्री केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भेटून भविष्याच्या दृष्टीने कार्यकर्त्याना ग्राह्य धरणार नाही तो पर्यंत कुठला ही रिपाई कार्यकर्ता प्रचार अथवा इतर कार्यक्रमात सहभात्री होणार नाही ही भूमिका घेतली वेळोवेळी होणाऱ्या प्रचार दौरे , सभामधून रिपाई कार्यकर्ताची उणिव भासू लागल्याने तातडीने जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबई ( बांद्रा ) येथील पक्ष कार्यालयात जावून रामदास आठवले यांची कार्यकर्त्यासमवेत समज – गैरसमज दूर करत नाराजगी दूर केली . मात्र लोणी येथे कार्यकर्त्याची मंत्री दादा भूसे यांच्या उपस्थितीत बैठक घेवून केवळ चर्चा करुन आश्वासनाचे बोळवण केल्याचे दिसून येत असून दक्षिणेतील कार्यकर्त्याना केवळ आश्वासीत केले मात्र उन्हाच्या चढत्या पाऱ्याबरोबर निवडणुकीचे जस – जसे वारे वाहू लागले तस – तसे रिपाई कार्यकर्ते कोमात जावू लागल्याचे चित्र दिसत असल्यानेचं रिपाई राज्य कार्यकारणी व जेष्ठांनी आक्रमक पावित्रा उचलत आता माघार नाही . .

” लढाई माझ्या हक्काची ” ही निर्णायक भूमिका घेण्याकरिता बुधवार दि . २४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजता ” हॉटेल पुर्णा ” एल & टी क्लब हाऊस जवळ , बोल्हेगांव रोड , सावेडी ( नगर ) येथे प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून या बैठकीकरिता जिल्हासंपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , बाळासाहेब गायकवाड , राजाभाऊ कापसे , दिपकराव गायकवाड , सुरेंद्र थोरात , सुनिल साळवे , लॉरेन्स स्वामी , रमेशराव गायकवाड , जनार्धन अब्दुले गुरुजी , भिमा बागुल , पप्पू बनसोडे , अंकुश भैलुमे , अजय साळवे , कुंडलिक गंगावणे , दत्ता कदम , विवेक भिंगारदिवे , किरण दाभाडे , योगेश त्रिभुवन , विजय भाबंळ , संजय कांबळे , सौ आरती बडेकर , माया जाधव , सारिका गागुर्डे , सुरेश भागवंत , नाना पाटोळे , राजू उंबाळे , राजा जगताप , अविनाश भोसले , राजू जगताप , बाळासाहेब शिंदे ,विलास नाना साळवे , सतीश भैलुमे , बाबा राजगुरु , सतिष मगर , गौरव घोडके , विशाल घोडके , रवि आरोळे, लोकेश बर्वे , गौतम घोडके , रवि दामोधरे आदीसह आजी – माजी जिल्हाध्यक्ष , तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

चौकट
” कुठल्याही प्रकारे वरिष्ठांचा आदेश नसताना रिपाईच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने युतीचा प्रचार अथवा कार्यक्रमात सहभागी झाले अशा पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबीत करण्यात येणार आहे ”
” आम्ही कार्यकर्ते काल परवाचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले नसून ४० – ४५ वर्ष चळवळीत निस्वार्थीपणे काम करणारे व उडत्या पाखरांचे पंख मोजणारे मुराबी कार्यकर्ते आहोत तर कार्यकर्त्यांना फितावणाऱ्यांना आम्ही जाणून आहोत
विजयराव वाकचौरे ( प्रदेश उपाध्यक्ष , रिपाई )
