कर्जत । झुंजार न्यूज
2024 लोकसभेच्या रणधुमाळी सुरु असून नगर , शिर्डी मधून विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी शिर्डीतून तिरंगी व नगरमधून दुरंगी लढती होण्याचे चित्र दिसत आहे सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट दिसेल मात्र रिपाईसह विविध गटांच्या नाराजी दूर करण्याची मोठी कसरत सध्या युती व आघाडीतून होत आहे . मात्र युतीचा सहयोगी असणारा रिपाई पक्षाची नगरमधून नाराजी दूर करण्यात विखे पाटील यांना यश आले मात्र कर्जत तालुक्यात झालेल्या रिपाई बैठकीतून नाराजीचा सूर बाहेर आला तेथील कार्यकर्त्यांनी रामदास आठवले यांच्याशी येत्या दोन दिवसात भेट घेवूनचं पुढील निर्णय घेण्याची भूमिका घेतली .
यावेळी रिपाई ( आठवले ) कर्जत येथील आक्काबाई नगर येथे रिपाई उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश अण्णा भैलुमे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संप्रन्न झाली .
अंकुश भैलुमे म्हणाले की , गेल्या अनेक वर्षापासून युती कडून आम्हाला सन्मान मिळत नाही कार्यकर्त्यांना सत्तेची पदे दिली जात नाही केवळ यांची हुज्यागिरी करावी लागते . निवडणुका आल्या की , यांच्या मागे धावणे , यांचा आदेश कधी येतो यांची वाट पाहणे हेचं आतापर्यंत इतिहास असल्यानेचं आता तरुणाई आक्रमक झाली आहे तरुणांईला आता , लगेचं , ताबडतोब नुसार परिणाम हवा असतो मात्र हे राजकिय पुढारी हे समजावून घेत नाही आता हीचं वेळ आक्रमक होण्याची असल्यानेचं पुढील निर्णय हा वरिष्ठांशी घेवूनचं घेणार आहे .
यावेळी दत्ता कदम(जिल्हा उपाध्यक्ष) , रोहन कदम (व्हाईस चेअरमन खादी ग्राम उद्योग), विशाल काकडे (युवक जिल्हा उपाध्यक्ष) , सतीश भैलुमे (तालुकाध्यक्ष कर्जत), सागर कांबळे ( युवक शहराध्यक्ष कर्जत) , अनिल गंगावणे , अविनाश चव्हाण , कुंदन भैलमे, , कुंडलिक गंगावणे सतीश आल्हाट , दादा आखाडे , बळी कांबळे,पोपट गंगावणे, अमोल देवळे सर, विजय गंगावणे, बापू साळवे, सुजित भैलमे, दत्ता भैलुमे, धनंजय कांबळे, बन्सी शिंदे, शशिकांत अडसूळ, जवान भैलुमे , भीमराव वाघ साहेब, नितीन थोरात, बाळासाहेब गंगावणे, दादासाहेब गंगावणे, रावसाहेब गंगावणे, विकास गंगावणे, दत्तात्रय गंगावणे, आजिनाथ गंगावणे, संतोष आढाव, संदीप वाघमारे, सुभाष गंगावणे, विष्णू चव्हाण, अब्बास तांबोळी, असलम शेख, मल्हारी कांबळे, प्रवीण भैलुमे, आदित्य भैलुमे, नितेश बापट, बाळासाहेब वाघमारे, अमजद शेख, वशिम शेख, सागर भैलुमे, सनी विळेकर, मेहफुफ सय्यद, आजिनाथ राऊत, तुषार गोरे, प्रशांत होले, सिद्धार्थ कदम, आझाद कुरेशी, बापू डोंगरे, हिसार भाई कुरेशी, उत्तम सोनमाळी, वैभव आखाडे, संघर्ष गाडे, दया भैलुमे, रोहित थोरात, बाळासाहेब भैलुमे, प्रसन्न भोज, ओमकार जाधव, यश जाधव, अनिकेत थोरात, रोहित राऊत, तुषार पवार, सुमित खुडे, विनायक खुडे, देवराम खरात (पत्रकार), रजित राक्षे, योगेश राक्षे, बाळू साळवे, अक्षय गाडे, सुरज भाले, राहुल राक्षे, योगेश राक्षे, रंजीत राक्षे, मनोहर राक्षे, अजय राक्षे, सुनील गजरमल, शुभम पानसरे, अजय साळवे, सुरज साळवे, प्रतिक कदम, इमरान शेख, आकाश कदम, गोविंद गोरे, दिलीप चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
Post Views: 835
