शिर्डी । झुंजार न्यूज

राज्यात वारकरी संप्रदाय फार मोठा असून त्यांचे नेहमीचं सहकार्य व आशिर्वाद राजकारणी लोकांना असते मागिल सरकारच्या काळात साधू – संतावर अनेक हल्ले झाले मात्र या सरकारच्या काळात एक पण हल्ला झाला नसल्यानेचं आध्यमिकातील साधू – संतांचा आशिर्वाद  सरकारच्या पाठींशी भक्कमपणे असून सरकार सुध्दा त्यांच्या सुरक्षेसाठी भक्कम असल्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना म्हणाले .
शिर्डी येथील एका खाजगी हॉटेलमध्ये आध्यमीक मधील वारकऱ्यांच्या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते . यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे , संजय चौधरी , उमेदवार लोखंडे , यांच्यासह साधू -संत मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की , राज्यातील साधू – संत व वारकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार कटिबध्द असून त्यांच्या सर्व अडी – अडचणी व समस्या सोडविल्या जाणार आहे तर शिर्डीचे उमेदवार हे युतीचे असून त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी केले .
चौकट
शिर्डीतील झालेल्या दिवस भरच्या कार्यक्रमातून पत्रकारांनी वृत्ताकन केले मात्र शेवटी पत्रकार परिषद होईल या हेतूने पत्रकार ठाण मांडून बसले होते मात्र वेगवेगळ्या संघटना , कार्यकर्त्यांना भेटा – भेटताचं खूप उशिर झाल्याने शेवटच्या क्षणी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांची दिलगिरी व्यक्त करत ” मी पुन्हा येईल व तुमच्याशी दिलखुलास गप्पा करून ” असे म्हणाले .  
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed