आश्वी । झुंजार न्यूज
दि 30 एप्रिल 2024 मिळून आलेल्या माहितीनुसार संगमनेर शहर असो की तालुका या परिसरात विविध ठिकाणी अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्या अनुषंगाने काही ठिकाणी शासकीय कर्मचारी अधिकारी कारवाई देखील करत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यामध्ये एक महेंद्रा कंपनीचा लाल कलर असलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली अवैध वाळू वाहतूक करत असताना काही दिवसांपूर्वी धरला गेला अधिकाऱ्यांनी तो ट्रॅक्टर आणि ट्रॉली काही त्याचवेळेस आश्वी पोलीस ठाण्याच्या आवारात आणून कारवाई करून ते वाहन पोलीस ठाण्याच्या आवारातच जप्त करून ठेवलेले होते.

मात्र कालच मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी रात्री उशिरा आश्वी पोलीस ठाण्याचे दोन्ही सरकारी वाहन हे पेट्रोलिंग म्हणजेच गस्त घालण्यासाठी बाहेर गेले असता त्याचाच गैरफायदा घेऊन चोरट्यांनी. चक्क आश्वी पोलीस ठाण्याच्या आवारातूनच ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरून नेल्याची घटना घडली आहे.चोरट्यांच्या या धाडसामुळे पोलीस ठाणे आणि आश्वी गाव किती सुरक्षित आहे हे बघता एकूणच आश्वी पोलीस ठाण्याच्या गलथान कारभारावर आता बोट उचलले जात आहे सदरचा महेंद्रा कंपनीचा लाल कलर असलेला ट्रॅक्टर हा अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकाने भाडेतत्त्वावर घेतलेला असल्याची माहिती मिळवून आली आहे तर ट्रॉली देखील दुसऱ्या मालकाकडून भाडेतत्त्वावर घेतलेली होती.अवैध वाळू व्यवसाय करणारा एक मालक ट्रॅक्टर त्याचा दुसरा मालक आणि ट्रॉली ज्याची तो तिसरा मालक आता नेमका कोण गुन्हा दाखल करणार कोण कोणाची कशी तक्रार करणार आणि पोलीस यावर कसे कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यात विशेष म्हणजे चोरी गेलेला ट्रक्टर आणि ट्रोली हि पोलीस ठाण्यात होती त्या अनुषंगाने याची तक्रार पोलिसांनीच किंवा ज्या कुणी अधिकाऱ्यांनी आगोदर ते वाहन पकडुन कारवाई करून पोलिसांच्या ताब्यात दिले होते त्यांनी तक्रार करण गरजेच आहे परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली माहिती मिळालेली नाही परंतु सध्या स्थितीला पोलिस आणि ट्रॅक्टर चोर यांच्या विषयी आश्वी परिसरात विविध चर्चेला उधाण आलेलं आहे


