लोणी । झुंजार न्यूज 

सहकार, कृषि, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रातून ग्रामीण विकासाला चालना देणारे पद्मभूषण, माजी केंद्रीय मंत्री डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आज (रविवार ५ मे) रोजी प्रवरा परिवाराच्या वतीने प्रवरा उद्योग समूहातील विविध संस्थांमध्ये त्यांना अभिवादन कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
सहकारी चळवळीतून शेतकरी, कष्टकरी व उपेक्षित घटकांना विकासाची संधी प्राप्त करून देणारे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पा. यांची जयंती प्रवरा उद्योग समूहात साजरी करण्यात येत आहे. पद्मश्री डॉ. विखे पा. साखर कारखान्याच्या वतीने प्रवरानगर येथे डॉ. विखे यांच्या स्मृतीस्थळी त्यांना अभिवादन करण्यात येईल. प्रवरा शिक्षण संस्था, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, विविध सहकारी संस्था, महाविद्यालये आदी
ठिकाणी अभिवादन कार्यक्रम होत आहेत. लोणी बुद्रुक ग्रामस्थ सकाळी ९ वा. पद्मश्री विखे पा. यांना अभिवादन करणार आहेत. याप्रसंगी सामाजिक आणि संत साहित्याचे अभ्यासक प्रा. गणेश जी. शिंदे यांचे ‘जीवन सुंदर आहे,’ याविषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी वरदविनायक सेवाधामचे मठाधिपती महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर), महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा., जिल्हा बँकेचे संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पा., खा. डॉ. सुजय विखे पा., ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोणी बुद्रुक येथे श्रीराम मंदिर प्रांगणात होणाऱ्या या व्याख्यानंतर प्रसादाचे आयोजन केले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *