अहिल्यानगर । झुंजार न्यूज
आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजपा आणि एनडीएला भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केली आहे. तसेच त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला .



चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट निश्चित झाली आहे. महाराष्ट्राच्या विकासात अहमदनगर जिल्हा दिशा देणारा आहे. विखे पाटील यांचं मोठं योगदान आहे आज याची मला आठवण येत आहे. आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजपा आणि एनडीएला भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली. निवडणुकीआधी भानुमतीचा कुलाबा झाला होता तो मातीच्या किल्ल्यासारखा ढासळणार आहे. भारतीयांना संतुष्ट करण्याची ही निवडणूक आहे. इंडिया आघाडी आपल्याच लोकांच्या तूष्टीकरणांमध्ये लागली आहे.

काँग्रेसने 50 वर्ष केवळ गरिबी हटावचे नारे दिलेत
काँग्रेसला मुस्लिम लीग बनूनन टाकले आहे. एनडीएचा मुद्दा विकास, सुरक्षा, सन्मान आणि स्वाभिमान आहे. मात्र काँग्रेस यामधील कोणत्याही मुद्द्यावर बोलत नाही. काँग्रेसने 50 वर्ष केवळ गरिबी हटावचे नारे दिलेत. इंडिया आघाडीचे सरकार आले तर गोर गरिबांचे आरक्षण काढून घेऊन ते मुस्लिम लोकांना देतील. स्वतःच्या वोट बँकेला खुश करण्यासाठी ते हा प्रयत्न करत आहेत, असा आरोप यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

मोदी सरकारचे प्रथम प्राधान्य शेतकरी
मोदी सरकारने सुरक्षा विकासाची गॅरंटी दिली आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांना संकटात ढकलले आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे 1970 धरणाचे काम सुरू झाले आहे. त्यावेळी धरण बनवण्यासाठी 8 कोटी किंमत होती त्याची किंमत आता 5 हजार कोटी झाली. हे पाप काँग्रेसने केले आहे. निळवंडे धरणातून शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. मोदी सरकारचे प्रथम प्राधान्य शेतकरी आहेत. मोदी सरकारच्या काळात ऊस उत्पादकांना अधिक पैसे मिळाले आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
मोदी सरकार 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार आहे. अहिल्यानगर- सोलापूर महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे, एअरपोर्टचा विकास करणे याकडे आमचे लक्ष आहे. शिर्डीच्या भाविकांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी, आम्ही प्रयत्नशील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे”
