शिर्डी । झुंजार न्यूज 

शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी शिर्डी लोकसभा निवडणुकीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांना बिनशर्त  पाठिंबा दिल्याने दिवसेंदिवस रुपवते यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याने इतर उमेदवारांचे दाबे दणाणल्याचे चित्र दिसू लागले आहे .
यावेळी आ कपिल पाटील म्हणाले की , आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी उत्कर्षा रुपवते यांची  उमेदवारपदी केलेली निवड अतिशय योग्य असून शिर्डी मतदारसंघातून प्रथम महिला निवडणुक लढवीत असल्याने त्यांचा विजय निश्चित असून याकामी मी पुर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले .
आ कपिल पाटील यांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे मला निश्चितपणे बळ मिळालं असून खरोखर लोकांचे मिळाणारे प्रेम यातचं माझा विजय निश्चित आहे . 
कपिल पाटील यांनी दिलेला पाठिंबा म्हणजे विजयाची नांदी आहे. शिर्डी मतदारसंघात परिवर्तन घडणार हे आता निश्चित झाल्याने चला आता साथी – साथीने परिवर्तन घडवूया असे शेवटी रुपवते म्हणाल्या .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *