संगमनेर
2024 लोकसभेची धामधुमीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून प्रचार हा शिगेला पोहचला असताना येथे महाविकास आघाडी , युती व वंचित मध्ये तिरंगी लढत होत असल्याने वंचित व आघाडीने प्रचार आघाडी घेतल्याने लोखंडेकरिता स्वतः मुख्यमंत्र्यांना मदतीस यावे लागते हे कसामुळे तर आता पर्यतच्या प्रचार अथवा विविध कार्यक्रमातून युतीच्या घटक पक्षातील रिपाईचे पदाधिकारी चमकत नसल्याचे चित्र दिसत आहे मात्र मुख्यमंत्री येवून गेल्यानंतर चित्र बदलले का ? अशा एक ना अनेक चर्चाला उधान !
संध्याची निवडणुकीच्या रेशीखेस मध्ये शिर्डी लोकसभेमधून महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे , युतीकडून सदाशिव लोखंडे तर वंचित कडून तरुण तडफदार महिला उत्कर्षा रुपवते यांच्या तिरंगी लढत होत असताना वाकचौरे यांची मदार ही माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात तर लोखंडे ची मदार ही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आहे तर उत्कर्षा रुपवते यांनी दारोदारी जावून लोकाच्या स्वतः भेट घेवून भावनिक आवाहन करत आहे तर याचंबरोबर सोशल मीडिया द्रारे प्रचार चालू आहे
2009 ला वाकचौरे हे खासदार झाले त्यांनी विकासकामा महत्व दिले मात्र सभा मंडपा व्यतिरिक्त काहीचं केले नाही तर त्यांचा संपर्क सुध्दा चांगला राहिला मात्र दल बदल केल्याने त्यांना लोकांची नाराजी 2014 भोवली त्यानंतर 2014 लोखंडे निवडून आले मात्र ते 10 वर्ष लोकांमध्ये फिरकलेचं नाही त्यामुळे त्याच्यावरही लोक नाराज झाले . त्यामुळे लोकांच्या मनात परिवर्तनाची लाट सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले त्यात वंचितकडून उत्कर्षा रुपवतेंची उमेदवारी जाहिर झाली म्हणत्या ना अपेक्षा प्रमाणे फलित झाले फादी तुटायला व कावळा बसायला एक वेळ त्यानुसार लोकांच्या मनात परिवर्तनाची लाट त्यात उत्कर्षा रुपवते ची एन्ट्री ! त्यामुळे जेथे जाईल तेथे रुपवतेंना साथ मिळताना दिसत असल्याने आजी – माजीचे ढाबे दणाणले त्यांच पार्श्वभुमीवर स्वतः मुख्यमंत्री शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा येत आहे ते ही संगमनेर शहरात !
संगमनेर शहरात येणारा मुख्यमंत्री हा बदलत असतो आतापर्यंतचा इतिहास आहे मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पुढील राजकिय प्रवास हा अडचणीचा ठरवू शकतो का ?
गेल्या अनेक दिवसापासून युतीतील घटक पक्ष असणाऱ्या रिपाई पक्षातील जेष्ठ पदाधिकारी हे कुठल्याही स्टेजवर दिसत नाही त्यांना डावलले जात असल्याची चर्चा आहे मात्र रिपाईला जर प्रवाहात घेतले जात नसल्याने विजय वाकचौरे , बाळासाहेब गायकवाड , श्रीकांत भालेराव , सुरेंद्र थोरात , सुनिल साळवे हे गुरुवार दि 9 मे 2024 रोजी नगर येथे येणाऱ्या रामदास आठवले यांच्या कानावर घालणार आहे .
वंचित व रिपाई पक्षात फरक आहे रिपाई पक्षाचे जिल्हयातील गावा गावात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त असून या निवडणुकीत कोणाचे काम करायचे याबाबत वरिष्ठांकडून येणाऱ्या आदेशाची प्रतिक्षा करत असल्याचे विजयराव वाकचौरे यांनी सांगितले .
