शिर्डी । झुंजार न्यूज

संविधान धोक्यात नसून येणाऱ्या 2024 निवडणुकीच्या निकालात इंडिया आघाडी धोक्यात तर संविधान बदलणे ही केवळ विरोधकाकडून अफवा पसरविल्या जात असून कोणाचा बाप आला तरी संविधान बदलले जाणार नाही अशी भीमगर्जना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली 
शिर्डी येथे रिपब्लिकन कार्यकर्ता संवाद मेळाव्या प्रसंगी रामदास आठवले बोलत होते . कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात हे होते तर जीत आठवले , शिर्डी विदयमान खासदार तथा युतीचे उमेदवार लोखंडे , राज्याचे उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे , बाळासाहेब गायकवाड , राजाभाऊ कापसे , अंकुश भैलुमें , दिपकराव गायकवाड , भिमा बागुल , पप्पू बनसोडे , आशिष शेळके , सुभाष त्रिभुवन  , कैलास कासार , रमेश गायकवाड , किशोर वाघमारे , बाळासाहेब कदम , नानासाहेब कदम , संपत भोसले , वर्पे आदीसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी रामदास आठवले पुढे म्हणाले की , संपूर्ण देशात आपल्या रिपाई पक्षाचे जाळे विणलेले असताना रिपाईला एक सुध्दा जागा न दिल्याने माझ्यासह कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरली गेली मात्र जागा वाटपामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याचे मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले व रिपाई पक्षाला सत्तेत सन्मानाची वागणूक दिली जाईल असे आश्वासित केल्याने कार्यकर्त्यांशी चर्चा करुन विकासाला गती देणाऱ्या नरेंद्र मोदी बरोबर जाण्याची तातडीने भूमिका घेतली . शिर्डीतून मला उमेदवारी दिली गेली नाही म्हणून कार्यकर्ते नाराज झाले होते त्यांनी कुठल्या प्रवाह न जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र आपला रिपाई पक्ष हा युतीचा मित्र पक्ष असल्याने मोदीचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्ते मन वळविण्याचा प्रयत्न करत त्यांची नाराजी दूर केली भविष्यात माझ्या कार्यकर्त्यांना सत्तेचा सहभाग मिळाला पाहिजेल त्याकरिता मुख्यमंत्री ‘ उपमुख्यमंत्री , राधाकृष्ण विखेशी चर्चा केली असून उमेदवार लोखंडे सुध्दा भविष्यात आपणास मदत करतील असे सांगितले .
तर संविधानामुळे लोकशाही मजबूत असल्याने मोदीनी संविधानाचा नेहमीचं सन्मान केला . देशा त संविधान दिन सुरु केला , इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारकांच्या कामास गती दिली , असे एका ना अनेक योजना राबवून सर्व जातीच्या लोकांना विकासाच्या प्रवाहात आणल्यानेचं राज्यात ४० पेक्षा जास्त व देशात ४०० पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला .
” यावेळी गेल्या अनेक दिवसापासून 2024 लोकसभा निवडणुकीची धामधुमी सुरु असताना युतीचे उमेदवारांनी रिपाई कार्यकर्त्याला प्रवाहात घेतले नसल्याने जिल्हयातील रिपाई कार्यकर्ते संभ्रमात होते . आठवले यांचा आदेश मात्र उमेदवार विचारात नसल्याने कोणाचे काम करायचे हे समजेनासे झाल्यानेचं समज , गैरसमज व ग्रऱ्हाणे विजय वाकचौरे , श्रीकांत भालेराव , सुरेंद्र थोरात , राजाभाऊ कापसे यांनी कार्यकर्त्यांच्यावतीने रामदास आठवले व उमेदवार लोखंडे यांच्या समोर मांडले “
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed